रस्त्यावर फुगे विकणार्‍या मुलासह खा. नुसरत जहाँच्या फोटोंनी जिंकलं सर्वांचं मन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या काही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या एका रस्त्यावरील फुगे विकणाऱ्या मुलासोबत दिसत आहे. या फोटोला 40 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याने जात असताना नुसरत जहां यांची भेट एका दीड वर्षाच्या फुगे विकणाऱ्या मुलासोबत झाली. त्यानंतर त्यांनी त्या मुलाला मिठी मारली. याबाबतची एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर टाकली ज्यामध्ये ते लिहितात की, फुगे विकणाऱ्या या छोट्या मुलाने माझा विकेंड स्पेशल बनवला . .
जो की, फुग्यांपेक्षा अधिक कलरफुल आणि प्रेमळ आहे.

नुसरत जहां यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत म्हंटले आहे की, मनापासून प्रेम केल्याबद्दल आम्ही तुमचे कौतुक करतो. त्यातच बिग फॅन नावाच्या एका युजरने लिहिले की, तुम्ही खूप चांगल्या आहेत ईश्वर तुमच्यावर नेहमी कृपा ठेवेल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like