पश्चिम बंगालमधील भ्याड हल्ल्याचा शिक्रापूरमध्ये निषेध

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिक्रापूर येथे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकार च्या विरोधात हातामध्ये निषेध फलक घेऊन निषेध करण्यात आला.

या वेळी बोलताना शेळके म्हणाले की ममता बॅनर्जी यांच्या या वृत्तीबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करतो. पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद व निवडून आलेले आमदार यांच्यामुळे ममता बॅनर्जी यांना हे सहन होत नाही, म्हणून त्या हल्ल्याला प्रोत्साहन देत आहेत असा आरोप माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके यांनी केला.

या वेळी प्रदेश युवा मोर्चा सदस्य पंडितआप्पा भुजबळ म्हणाले कार्यकर्त्यांच्या वर होत असलेले हे भ्याड हल्ले त्वरित थांबवण्यात यावेत अन्यथा युवा मोर्चाचे कार्यकर्ते शांत बसणार नाही आम्हला ही आरे ला कारे करता येत आमचा अंत पाहू नका असे हल्ले करण्यापेक्षा सर्वांनी कोरोना महामारी हटवण्यासाठी एकत्र येऊन मदत करावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे, तरीपण तेथील सरकारचे किंवा तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निर्घुणपणे हाणमार करत आहेत, मग हे कुठल्या लोकशाहीला धरून आहे अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला .

या आंदोलनाच्या वेळी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य संकेत खरपुडे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष बाबासाहेब दरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस केशव पाचर्णे, सरचिटणीस रवी गव्हाणे, उपाध्यक्ष अमोल गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे सिद्धेश पाचर्णे, तेजस सिनलकर, पंकज गवारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करत सोशल डिस्टन्स, स्यानिटायझर, मास्क चा वापर करत शांततेत हे आंदोलन करण्यात आले