जबलपूर : West Central Railway Recruitment 2024 | दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे. पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर यांनी तीन हजारांहून अधिक अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. याबाबत ५ ऑगस्टपासून नोंदणी सुरु झाली असून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२४ आहे.
या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन करता येईल. यासाठी पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. wrc.indianrailways.gov.in या लिंक वर क्लिक करून अर्ज करता येईल.
भरती मोहिमेद्वारे एकूण ३३१७ पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यापैकी १२६२ पदे जेबीपी विभागासाठी, ८२४ पदे बीपीएल विभागासाठी, ८३२ पदे कोटा विभागासाठी, १७५ पदे सीआरडब्ल्यूएस बीपीएल विभागासाठी, १९६ पदे डब्ल्यूआरएस कोटा विभागासाठी आणि २८ पदे एचक्यू/जेबीपी विभागासाठी आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ही परीक्षा १०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवार काही पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. वेबसाईटवर दिलेल्या नोटीसवरून आपण त्यांची सविस्तर माहिती घेऊ शकता.
१५ ते २४ वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गाला वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आहे.
तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली आहे.
हा अर्ज करण्यासाठी १४१ रुपये फी आहे. एससी, एसटी, पीएच श्रेणी आणि महिला उमेदवारांसाठी ४१ रुपये शुल्क आहे.
या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर असणार आहे.
म्हणजेच उमेदवारांना निवडीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.
पदानुसार इयत्ता दहावी, बारावी आणि संबंधित ट्रेडमधील डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा