वेस्ट इंडीजच्या ‘या’ खेळाडूनं घेतली निवृत्ती मागे, T – 20 वर्ल्डकपमध्ये खेळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच झालेल्या वेस्टइंडीज सोबतच्या टी 20 मालिकेला पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वल्डकपची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात होते. मात्र या मालिकेत वेस्टइंडीज संघाला म्हणावं तस यश मिळवता आलेलं नाही, मात्र काही खेळाडूंच्या कामगिरीमुळे रंजकदार सामने प्रेक्षकांना पहायला मिळाले. वेस्टइंडीज संघाला पराभव पत्कारावा लागला असला तरी वेस्टइंडीजसाठी एक आनंदाची बातमी आहे. वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडूने आपली निवृत्ती मागे घेत आगामी ट्वेंटी ट्वेन्टी मालिकेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आपली निवृत्त मागे घेत आगामी मालिकेमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  ब्राव्होनं ऑक्टोबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती मात्र आता त्याने आगामी ट्वेंटी – 20 वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

ब्राहोणे विंडीजकडून सप्टेंबर 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी – 20 सामना खेळला होता. त्यानं 40 कसोटीत 2200 धावा आणि 86 विकेट्स घेतल्या आहेत. वन डेत 164 सामन्यांत त्याच्या नावावर 2968 धावा आणि 199 विकेट्स आहेत, तर 66 ट्वेंटी-20 सामन्यांत 1142 धावा व 52 विकेट्स आहेत. कर्णधार पोलार्ड आणि प्रशिक्षक फील सिमॉन्स यांच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मी तयार असल्याचे सांगत ब्राव्होने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

ब्राव्होने केले बॉलीवूड अभिनेत्रीला प्रपोझ
ब्राव्हो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. मैदानातील खेळासोबत बॉलीवूड गाण्यांसाठी देखील ब्राव्हो लोकप्रिय आहे. एवढेच नाही तर ब्राव्होने एका बॉलीवूड अभिनेत्रीला प्रपोझ देखील केले होते अशी माहिती मिळतेय. या अभिनेत्रीने यारिया, इरादा आणि वीकेंड्स या सिनेमांमध्ये काम केले आहे.राधिका बांगिया असे अभिनेत्रीचे नाव आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like