IPL मधील क्रिकेटपटूच्या गाडीला अपघात, ‘या’ संघाची डोकेदुखी वाढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघातून खेळणाऱ्या खेळाडूचा गाडी चालवत असताना अपघात झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. हा खेळाडू स्वत: गाडी चालवत होता आणि त्याचवेळी त्याच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल सुरु होण्यासाठी आता फक्त एक महिन्यांचा अवधी बाकी आहे. यातच अपघातात खेळाडू जखमी झाला तर तो सराव कधी आणि कसा करणार याची चिंता राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापकाला आहे.

वेस्ट इंडिज संघातील जलत गोलंदाज ओशेन थॉमस हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. थॉमस याच्या गाडीला भीषण अपघात झाला. आयर्लंडविरुद्ध थॉमसने मागील महिन्यात अखेरची वनडे मॅच खेळली होती. रविवारी जमैकाच्या हायवेवर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. थॉमसच्या ऑडी कार दुसऱ्या एका गाडीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की थॉमसची गाडी पलटी झाली. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जमैकाच्या हायवे 2000 च्या ओल्ड हार्बर येथे हा अपघात झाला असून उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

राजस्थानच्या संघात मोठे बदल पहायला मिळाले आहेत यंदाच्या आयपीएलमध्ये ओशोने थॉमस हा पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सकडून खेळत नसून यापूर्वीही खेळलेला आहे. येत्या 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत तो राजस्थान कडून खेळणार आहे. थॉमसच्या अपघातामुळे राजस्थान रॉयल्सची डोकेदुखी वाढली आहे. राजस्थान संघाने 50 लाख बेस प्राइस असलेल्या थॉमसला 1.5 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते.