‘सॅल्यूट’ ठोकून आनंद व्यक्‍त करतो ‘हा’ बॉलर महेंद्रसिंह धोनीच्या देशभक्‍तीचा ‘दिवाना’ ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल हा भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या देशभक्तीमुळे त्याच्यावर खुश आहे. शेल्डन कॉटरेलने धोनीचे कौतुक करताना तो सच्चा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. शेल्डन कॉटरेल हा त्याच्या विकेट मिळाल्यानंतर सॅल्यूट ठोकून व्यक्त केल्या जाणाऱ्या आनंदासाठी ओळखला जातो. आर्मीमध्ये ज्या प्रकारे सॅल्यूट ठोकतात, तसाच सॅल्यूट तो विकेट मिळाल्यानंतर ठोकतो.

शेल्डन कॉटरेल याने सोशल मीडियावर धोनीचे कौतुक करताना ट्विटरवर एक व्हिडीओ शेयर करत त्याचे कौतुक केले आहे. २०१८ मध्ये महेंद्रसिंग धोनी याला पद्मभूषण मिळतानाचा हा व्हिडीओ त्याने शेयर केला आहे. कॉटरेल याने धोनीचे कौतुक करताना या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, धोनी क्रिकेटच्या मैदानावर एक प्रेरणा असून तो खरा देशभक्त आहे. त्याचबरोबर असा व्यक्ती आहे ज्याने स्वतःला देशासाठी समर्पित केले आहे. मागील काही दिवसांपासून मी आपल्या जमैकामधील घरी असून या वेळेत अनेक गोष्टींचा विचार करण्यास वेळ मिळाला आहे. त्याचबरोबर त्याने पुढे म्हटले आहे कि, मी हा व्हिडीओ मित्रांबरोबर असताना मुद्दामहून पोस्ट केला आहे कारण त्यांना माहित आहे कि, मी या सन्मानाबद्दल काय विचार करतो. कॉटरेल देखील आपल्या देशाच्या सैन्याचा हिस्सा राहिला असून आर्मीमध्ये ज्या प्रकारे सॅल्यूट ठोकतात, तसाच सॅल्यूट तो विकेट मिळाल्यानंतर ठोकतो. त्याच्या या कृतीसाठी तो जगभरात खूप लोकप्रिय आहे.

कॉटरेल देखील होता सैन्यात

कॉटरेलने स्वतःविषयी काही रोचक गोष्टी सांगताना म्हटले कि, तो देखील सैन्यात होता, त्यामुळे सैनिकांप्रती माझ्या मनात एक वेगळा आदर आहे. २९ वर्षीय विंडीज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१५ साली पदार्पण केले होते. त्याचवेळी त्याने बोलताना सांगितले कि, ज्यावेळी मी सैन्यात होतो त्यावेळी सहा महिने मी सलामी आणि मार्चचा सराव केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –