कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ‘विराट’ कामगिरी, असा ‘कारनामा’ करणारा बनला पहिलाच ‘कॅप्टन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान विंडीज संघाचा 318 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी खाते देखील उघडले. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या नावे नवीन विक्रमाची नोंद झाली असून परदेशात सर्वात जास्त कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम कर्णधार म्हणून त्याच्या नावावर झाला आहे.

याचबरोबर त्याने या विजयासह भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला मागे टाकले असून गांगुलीने 28 कसोटी सामन्यांत परदेशात 11 विजय मिळवले होते. तर कालच्या सामन्यात मिळवलेला विजय हा विराटचा 12 वा विजय होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 25 सामने खेळले असून यामध्ये 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा बहुमान देखील पटकावला आहे. या क्रमवारीत महेंद्रसिंह धोनी तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नेतृत्वाखाली परदेशात खेळलेल्या 30 कसोटी सामन्यांत 6 सामन्यांत विजय मिळवला होता तर चौथ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 17 पैकी 5 कसोटी सामन्यांत विजय मिळवला होता.

दरम्यान, विराट कोहलीने या विजयासह महेंद्रसिंह धोनी याच्या कसोटी सामन्यांतील विजयाच्या आकडेवारीची देखील बरोबरी केली. या कसोटीत मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघ 29 ऑगस्टपासून जमैकामध्ये दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –