Coronavirus : राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात सर्वाधिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक गतीने वाढत आहे. याचबरोबर मृत्यूची संख्याही जास्त प्रमाणात दिसत आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र रुग्णसंख्येत आघाडीवर आहे. तर मराठवाडा, विदर्भापेक्षा कोरोना रुग्ण संख्येबाबत पश्चिम महाराष्ट्राची चिंता गंभीर दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मृत्यूदर हा अधिक असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबई पुण्यात अधिक रुग्ण आढळून आले आहे. तर मृत्युदराची संख्या पाहता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमाण अधिक आहे. या जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झालीय. तसेच पुण्यामध्ये कोरोनाची संख्या दुपटीने असल्याने तरी देखील पुण्याचा मृत्यूदर मात्र काही प्रमाणात कमी आहे. परंतु, या जिल्ह्यामधील असणारा मृत्यूदर हा स्थानिक प्रशासनासाठी चिंतेची बाब झाली आहे. राज्याची तुलना बघता एकूण मृत्युपैकी २७ टक्के मृत्यू हे केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण मृत्यूचा आकडा हा १६५३५ इतका आहे. राज्यातील मृत्यूच्या १ चतुर्थांशपेक्षा अधिक एवढा हा आकडा आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ३८ लाख पार केला आहे. त्यापैकी सुमारे ६० हजारांहून जास्त रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. तर गतवर्षी कोरोना संकटात मृत्यूदर साधारण ३ ते ४ टक्के होता. तो या तुलनेत देशात कमी आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील आकड्यांनी मात्र राज्याची चिंता वाढवली टाकली आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा जवळपास १.१९ टक्के आहे. राज्याला कोरोनाचा फटका बसल्यामुळं महाराष्ट्राचा मृत्यूदर हा त्यापेक्षा अधिक म्हणजे १.५८ टक्के इतका आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची मृत्यूची टक्केवारी ही धक्कादायक आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ३.१५ टक्के तर जवळपास तेवढाच म्हणजे ३.१३ टक्के इतका मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. सातारा २.५७ टक्के, सोलापूर २.५४ टक्के मृत्यूदर आहे. बहुतेक तर आचरीची गोष्ट म्हणजे पुण्या-मुंबईत कोरोनाची इतकी संख्या असतानाही याठिकाणचा मृत्यूदर मात्र केवळ १.२१ टक्के म्हणजे राज्यापेक्षाही कमी आहे.