West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

नवी दिल्ली : West Nile Virus | रशियाने शरद ऋुतूमध्ये वेस्ट नाईल व्हायरस (West Nile Virus) चा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी मच्छर वाढण्यास अनुकूल वातावरण असते. या हंगामात मोठ्या संख्येने मच्छर अशाप्रकारच्या व्हायरसला आणू शकतात. रशियामध्ये होणार्‍या वेस्ट नाईल फीव्हरचा 80 टक्केपेक्षा जास्त परिणाम दक्षिण पश्चिम क्षेत्रात नोंदला जातो.

वेस्ट नाईल व्हायरस काय आहे (West Nile Virus)

डब्ल्यूएनव्ही एक संसर्गजन्य आजार आहे जो मच्छरांद्वारे पसरतो. तो पक्षांमधून मनुष्यात क्यूलेक्स मच्छर चावल्याने पसरतो. या कारणामुळे मनुष्यात घातक न्यूरोलॉजिकल (नसांशी संबंधीत) आजार होतो.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, व्हायरसमुळे 20 टक्के लोकांमध्ये वेस्ट नाईल फीव्हरची प्रकरणे येतात. हा व्हायरस झीका, डेंगी आणि पीतज्वर व्हायरसशी संबंधित आहे.

डब्ल्यूएनव्हीची काय आहेत लक्षणे

ज्यांना डब्ल्यूएनव्हीचा संसर्ग होतो त्यांच्यात सामान्यपणे हलकी लक्षणे किंवा कोणतेही लक्षण आढळत नाही. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, त्वचेवर चट्टे आणि लिम्फ ग्लँडमध्ये सूज यांचा समावेश आहे. हा काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत बरा होतो.

डब्ल्यूएनव्ही कुठे निर्माण झाला

डब्ल्यूएचओनुसार, डब्ल्यूएनव्ही सर्वप्रथम 1937 मध्ये युगांडाच्या वेस्ट नाईल जिल्ह्यात एका महिलेत आढळला होता. तो 1953 मध्ये नाईल डेल्टा क्षेत्रात कावळे आणि कोलंबीफॉर्म्स नावाच्या पक्षात आढळला होता. 1997 च्या अगोदर डब्ल्यूएनव्हीला पक्षांसाठी रोगकारक मानले जात नव्हते.

परंतु इस्त्रायलमध्ये या व्हायरसच्या स्ट्रेनमुळे विविध प्रकारच्या पक्षांचा मृत्यू झाला, त्यांच्यात एन्सिफेलायटिस आणि पॅरालिसिसची लक्षणे आढळली होती. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, मनुष्यात डब्ल्यूएनव्ही संसर्ग 50 वर्षांपासून आहे.

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

हा कधी होतो धोकादायक

जर वेस्ट नाईल व्हायरस मेंदूत गेला तर तो घातक ठरू शकतो. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते. ज्यास एन्सिफेलायटिस म्हणतात. किंवा मेंदूच्या जवळपासच्या ऊती (टिश्यू) आणि स्पायनल कॉर्ड (पाठीचा कणा) मध्ये सूज येऊ शकते ज्यास मेनिन्जायटिस म्हणतात.

डब्ल्यूएनव्हीचे निदान कसे होते –

शारीरिक चाचणी, वैद्यकीय इतिहास, आणि लॅबोरेटरी चाचणीत याचे निदान होते.

कुणाला जास्त धोका –

ज्येष्ठ, मुले, आणि असे लोक ज्यांची इम्यून सिस्टम कमजोर असते.

काय आहेत उपचार –

मनुष्यातील डब्ल्यूएनव्ही आजारावर कोणतीही विशेष व्हॅक्सीन किंवा उपचार नाहीत. मच्छरांना
प्रतिबंध करणे हा यावरील प्रमुख प्रतिबंधात्मक उपाय आहे. व्हायरसच्या नसांवरील हल्ल्यापासून
बचाव केला पाहिजे.

नेहमी अशावेळी रूग्णांना हॉस्पिटमध्ये दाखल करावे लागते आणि त्यांना इंट्राव्हीनस द्रव, श्वसनात मदत आणि दुसर्‍या संसर्गापासून बचाव केला जातो. जलवायु परिवर्तनामुळे हलक्या तापमानात डब्ल्यूएनव्ही सारखा आजार जास्त व्यापक होऊ शकतो.

हे देखील वाचा

Thane Crime | धक्कादायक ! अनिधकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, हाताची 3 बोटं छाटली

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

MNS DahiHandi | ठाणे, दादरला मनसेचा ‘गनिमी’ कावा करीत मध्यरात्रीच फोडली दहीहंडी

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Audi Q3 accident | दुर्दैवी ! ऑडी कारच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; आमदाराच्या मुलासह सुनेचा समावेश

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  West Nile Virus | what is west nile virus after corona now the risk of infection with west nile virus russia warns know how you can prevent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update