Western Maharashtra Dams | पश्चिम महाराष्ट्रातील धरण परिसरात पावसाची ओढ; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंतेत वाढ

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Western Maharashtra Dams | पश्चिम महाराष्ट्रातील धरणांच्या (western maharashtra Dams) साखळीतील (chain of dams) पाणीसाठ्यावर पश्चिम महाराष्ट्र (western maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathwada) मोठ्या भुभागावरील लोकसंख्येचा वर्षभराचा पाणी पुरवठा (water supply) अवलंबून असतो. सध्या धरण (Dam) परिसरात पावसाने ओढ दिली आहे.

Alandi News | माउलींच्या सोहळ्यावर कोरोनाचे सावट? आळंदीच्या नगराध्यक्षांसह 37 वारकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

पुढील १० दिवसात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने (Meteorological Department) जाहीर केले आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चिंतेचे सावट पसरले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भीमा खोर्‍यातील (Bhima Valley) २६ मोठ्या धरण प्रकल्पापैकी केवळ टेमघर डॅम परिसरात (temghar dam) १० मिमी पावसाची गेल्या २४ तासात नोंद झाली आहे. मुळशी ८, वडिवळे ३ मिमी पाऊस झाला आहे. अन्य धरणक्षेत्रात पावसाचा मागमूस नव्हता. धरणातील (dam) पाणीसाठा झपाट्याने खाली होत असून जुलै महिना सुरु झाला असला तरी या धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांपर्यंतही पोहचलेला नाही. पुणे शहराला पाणी पुरवठा (pune city water supply) करणार्‍या खडकवासला धरण (khadakwasla dam) प्रकल्पात केवळ २९ टक्के पाणीसाठा आहे. त्यात पुढील काही दिवस पावसाची ओढ तसेच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज यामुळे आता आहे ते पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Western Maharashtra Dams | Rainfall in the dam area of ​​Western Maharashtra is low; An increase in concern over the weather department’s forecast

भीमा खोर्‍यांप्रमाणेच ((Bhima Valley)) कृष्णा खोर्‍यातील ((Krishna Valley)) १३ धरणांमधील अशीच परिस्थिती आहे. नेहमी धो धो पाऊस कोसळणार्‍या कोयना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात पावसाची नोंद झालेली नाही. कोयना धरणातील पाणीसाठा (Water storage in Koyna Dam) ३७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासात कासारी ९ (Kasari) , पाटगाव ७ (Patgaon), दुधगंगा ३ (Dudhganga) मिमी पाऊस झाला आहे. महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे केवळ ६ मिमी पावसाची नोंद आहे.

Pimpri Crime News | वाढदिवसाचं सेलिब्रेशन जीवावर; लोणावळ्याच्या खाणीत बुडून दोघांचा मृत्यू

काही छोट्या धरणातील पाणी साठा मुबलक असला तरी कोयना, राधानगरी (radhanagari),
तुळशी (tulshi), धोम़ (dhom) वारणावती (varnavati), दुधगंगा (Dudhganga) धरणातील
(dam) पाणीसाठा ४० टक्क्यांच्या खाली आहे. त्यामुळे भीमा खोर्‍याबरोबरच कृष्णा खोर्‍यातही
चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. दुसरीकडे पाऊस नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे
लावून बसला आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Western Maharashtra Dams | Rainfall in the dam area of ​​Western Maharashtra is low; An increase in concern over the weather department’s forecast

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update