काँग्रेसला धक्का ! मंत्रिपद न मिळाल्यानं ‘हा’ दिग्गज नेता सोडणार पक्ष ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने राष्ट्रावादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील आमदाराकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच होती. अखेर काँग्रेसने पी.एन. पाटील यांना डावलून सतेज पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घातली. यामुळे नाराज झालेल्या पी.एन. पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचे आवाहन पी.एन. पाटील यांना केले आहे.

मागील चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदार पी.एन. पाटील यांच्या पक्ष निष्ठेचे हेच फळ का असा सवाल करत पक्षनिष्ठेची नियमावली सांगा आणि त्यात आम्ही कुठे कमी पडलो हे देखील दाखवून द्या असा आक्रमक परवित्रा पी.एन. पाटील यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या समर्थकांचा आज (बुधवार) मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात समर्थक कार्यकर्त्यांनी पाटील यांना पक्ष सोडण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यात पक्षात राहण्याबाबत आमदार पी.एन. पाटील यांना फेरविचार करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाटील हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसे झाले तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. दरम्यान, खातेवाटपावर काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून अंतिम तोडगा काढून खातेवाटप जाहीर होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?