कोपरगावात ‘कोरोना’चा रिपोर्ट येताच रुग्णाने नदीपात्रात घेतली उडी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची (Corona) भीती मनात बसल्यामुळे अनेक रुग्णांनी जीवन संपविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना नगरमधील कोपरगावात घडली आहे. कोरोना (Corona) चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वाल्मिक वाळूंज असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

कोरोना झाल्याच्या धास्तीने कोपरगावातील वाल्मिक वाळूंज यांनी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाळूंज यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे धास्तीने त्यांनी कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर पुलावरून गोदावरी नदीपात्रात झोकून दिले. त्यांचा मृतदेह कोकमठाण शिवारातील हेमाडपंथी महादेव मंदिराजवळ आढळून आला. घटनेचा तपास पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे करीत आहे.