मुंबईची धमनी पुन्हा धोक्यात : इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आधिकाऱ्यांनी इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले आहे.

रेल्वे प्रशासनाला पोलिसांकडून मिळालेल्या फॅक्सनुसार पुलवामा हल्ल्यानंतर दहशतावादी हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी इतिहासातील सर्वात मोठा बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, मंदिरे या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाऊ शकतो. तसेच गुजरातमधील काही सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन , स्टॅचू ऑफ युनिटी उद्ध्वस्त करण्यासाठी साखळी बॉम्बस्फोट घडवले जाऊ शकतात.

काय आहे पत्राचा मजकूर
मोहम्मद इब्राहिम नावाच्या ग्रेडर हैदराबादच्या व्यक्तीसोबत रेहान नावाचा सुसाईड बॉम्बर तसेच एक वयस्कर महिलाही आहे. मोहम्मद इब्राहिम हा पुलवामा हल्ल्याशी संबंधित असून हे तिघेही मसूद अझरच्या दहशतवादी गटाशी संबंधित आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर रेल्वेस्थानक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व स्टेशन आणि रेल्वेवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विशेषतः जम्मू काश्मीरहून येणाऱ्या रेल्वेकडे लक्ष द्यावे असं पत्रात म्हटलं आहे. मात्र अद्याप या पत्राबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून आलेली नाही.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला. सुमारे ३५० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले. यानंतर पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली व बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्नही केला. अद्यापही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत.