तांत्रिक बिघाडामुळे ‘पश्चिम रेल्वे’ची वाहतूक विस्कळीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाटेत एका मागोमाग थांबून आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने तेथून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहेत. कामावर जाणाऱ्या नोकरदारांची प्रचंड गर्दी असता हा बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्याला किती वेळ लागेल, याविषयी नेमके सांगता येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

You might also like