Mumbai पश्चिम उपनगर Metro train ची सोमवारी ट्रायल, ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हजर होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो- 2 अन् मेट्रो- 7 या ट्रेन आता चाचणीसाठी सज्ज झाल्या आहेत. सोमवारी (दि. 31) दुपारी साडेबारा वाजता या मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मेट्रो लाइन येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हजर होण्याची शक्यता आहे. या मेट्रो Metro  लाइनसाठी अंतिम टप्प्यातील कामे झपाट्याने पूर्ण करण्यावर आता भर दिला जाणार आहे. या दोन्ही मेट्रो लाइन सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर या पट्ट्यातील 13 लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे

कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोच्या कामात अडचणी येत होत्या. काम करणाऱ्या कामगारांची संख्या देखील कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी देखील याचा मेट्रोच्या कामावर परिणाम झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या मेट्रो Metro प्रकल्पाचे काम सन 2016 मध्ये सुरू झाले. यंदा या कामाला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होणार आहे. सन 2031 पर्यंत या मेट्रोद्वारे सुमारे 1 कोटी प्रवासी प्रवास करतील. मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन ही 6 कोचची ट्रेन आहे. प्रत्येक कोचमध्ये 52 प्रवाशांची बसण्याची, तर 328 प्रवाशांची उभे राहून प्रवास करण्याची व्यवस्था आहे. मेट्रोच्या एका डब्यात एका वेळी 380 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या एका ट्रेनची प्रवासी क्षमता 2280 इतकी आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी