वैमानिकांप्रमाणे रेल्वे मोटरमन गार्ड मिळणार ‘संवाद’ सुविधा

मुंबई : मोटरमन आणि गार्ड यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी रेल्वेकडून मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सुविधा सुरु करण्यात आली आहे.

एअरपोर्ट ट्रॉफिक कंट्रोलकडून वैमानिकांना माहिती पुरविण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यासारखेच तंत्रज्ञानाचा वापर करुन मोटरमन आणि गार्ड यांना माहितीची सुविधा पुरविली जात आहे, असे पश्चिम रेल्वेचे अधिकारी आलोक कंसल यांनी सांगितले.

 

 

 

 

 

आम्ही मोबाईल रेल्वे रेडिओ कम्युनिकेशन सुरु केले आहे. या द्वारे मोटरमन आणि गार्ड यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. कोणत्याही घटनेत कंट्रोल रुममधून मोटरमन, गार्ड यांच्याशी संवाद साधता येईल किंवा ते थेट कंट्रोल रुमशी संपर्क साधू शकणार आहे. त्यातून तत्काळ पुढील कारवाई करता येईल. तसेच एखाद्या दुर्घटनेची माहिती तातडीने समजल्यावर तेथे लवकरात लवकर मदत पोहचविण्यास शक्य होणार आहे.