खरं की काय ! ‘उतरण’ मधली ‘ही’ निरागस अभिनेत्री अचानक झाली इतकी BOLD

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  लागोपाठ ७ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका, म्हणजेच कलर्स टीव्ही वरची ‘उतरण’ मधील सर्वांचेच लाडके पात्र हे ‘इच्छा वीर सिंग’ चे होते. इच्छा चे पात्र अगदी निरागसपणे साकारणारी अभिनेत्री होती टीना दत्त. प्रेक्षकांना टिनाचे सौम्यपण, निरागसपण आणि प्रामाणिकपणा खूप भावलेला.

उतरण हि मालिका २००८ पासून ते २०१५ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिली. २०१५ ला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि टीना दत्त चे चाहते तिची खूप आठवण काढू लागले. मालिका जरी संपली असली तरी टीना दत्त तिच्या शोशल मीडिया द्वारे तिच्या चात्यांच्या संपर्कात राहत असते. ती पहिल्यापेक्षा फारच हॉट आणि बोल्ड झाली आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर मालदीव मधील समुद्र जवळ केलेले हॉट बिकिनी फोटोशूट पोस्ट केले आहेत.

या फोटोजला टिनाने कॅपशन दिले कि, “जेव्हा सकाळ छानसा ब्रेकफास्ट आणि अंतहीन निळ्या समुद्रच्या दृश्यासह प्रारंभ होईल! जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण एक सुंदर स्वप्न पहात आहात आणि नंतर या सुंदर आश्चर्यकारक वास्तवात परत येण्यासाठी स्वत: ला चिमटा काढा! अरे मालदीव तू चित्रकलेसारखे, स्वप्नासारखे, एक सौंदर्य आहेस जे खरंच कधीच चित्रात टिपले जाऊ शकत नाही.”