जाणून घ्या पशु आधार कार्ड म्हणजे काय ? , योजनेचा शेतकर्‍यांना होतो असा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सतत उचलताना दिसत आहे. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई-गोपाला नावाचे अ‍ॅप लाँच केलं आहे. अ‍ॅप लाँच करताना पंतप्रधानांनी पशु आधार क्रमांकाचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, या अ‍ॅप मध्ये प्राण्यांचा आधार ठेवण्याचे काम पूर्ण झाल्यास प्राण्यांविषयी सर्व माहिती मिळवली जाईल.

या अ‍ॅपच्या द्वारे जनावरांची खरेदी विक्री सोप्पी होणार आहे. प्राण्यांचे टॅगिंग हे त्यांचे आधार कार्ड आहे. आता देशातील प्रत्येक गाय म्हशींसाठी एक अनोखा क्रमांक दिला जाईल. त्या माध्यमातून पशुपालकांना सॉफ्टवेअरद्वारे घरी बसून त्यांच्या जनावराची माहिती मिळणार आहे. तसेच लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय मदत यासोबत इतर कामे सहज रित्या करण्यात येतील.

भारतात पशुधनविषयक संबधी प्रचंड माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुधनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, पुढच्या दीड वर्षाच्या कालावधीत ५० कोटींपेक्षा अधिक गायींच्या मालकांना, पशुची जाती आणि उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पद्धतीने एक अनोखा आयडी (Animal UID Pashu Aadhaar) देण्यात येईल. ८ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग जनावराच्या कानात लावला जाईल. त्यावर १२ अंकी आधार क्रमांक असेल.

याबाबत बोलताना पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री संजीव बालयान म्हणाले, आजतागात सुमारे ४ कोटी गायी म्हशींचे आधार कार्ड बनविण्यात आले आहे. तर देशात ३० कोटी पेक्षा जास्त गायी, म्हशी आहेत. तसेच गायी म्हशीनंतर मेंढ्या, बकरी इत्यादींचा आधार तयार होईल. या कार्डमध्ये युनिक नंबर, मालकाचा तपशील आणि जनावरांच्या लसीकरण आणि प्रजननाची माहिती असेल. शेतकऱ्यांसाठी पशुपालक हे एटीएम मशीनसारखेच आहे. सध्या दुधासारखे कोणतेही उत्पादन वेगाने पुढे जात नाही. वेगाने चालत नाही. पुढील पाच वर्षात दुग्ध क्षेत्रातील सध्याची बाजारपेठ १५७ दक्षलक्ष मेट्रिक टन वरुन २९० दशलक्ष मेट्रिक टन होण्याची अपेक्षा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सचिव अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.

चतुर्वेदी पुढं म्हणाले, भारत सरकारने पशुसंवर्धन क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे एका वर्षात एक अब्ज एफएमडी लस देणे. जेणेकरुन हे सुनिश्चित करता येईल की गुरेढोरे रोगमुक्त राहतील. देशात सुमारे रोज ५० कोटी दुधाचे उत्पादन करण्यात येत आहे. त्यातील सुमारे २० टक्के संघटित व ४० टक्के असंघटित क्षेत्र खरेदी करते. सुमारे ४० टक्के दूध स्वतः शेतकरी वापरतो. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, हरियाणा कर्नाटक ही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक राज्ये आहेत.