मलायका-अर्जुनच्या लग्नाबद्दल अरबाजने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे १९ एप्रिल रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा बॉलीवूडमध्ये चांगल्याच रंगताना दिसून आल्या. यावर आता तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान यान आपली प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाच्या चर्च्यांवर त्याला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. यावर अरबाजने जोरात हसत यावर उत्तर देणं टाळलं.

अर्जुन आणि मलायका हे १९ एप्रिल रोजी ख्रिस्ती पद्धतीने लग्न करणार असल्यावरून अरबाजला प्रश्न विचारल्यावर अरबाज जोरात हसायला लागला आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला चिमटा काढत अरबाज म्हणाला की, “तुम्ही बुद्धीची चमक दाखवणारा प्रश्न मला विचारला आहे. तुम्ही या प्रश्नासाठी प्रचंड मेहनत घेतली असणार. पूर्ण रात्र तुम्ही या प्रश्नाच्या विचारात असणार. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे. पण जर तुम्ही प्रश्नाचा विचार करायला इतका वेळ घेतला तर मला उत्तराचा विचार करायला थोडा वेळ द्या. मी उद्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन” असं म्हणत अरबाजने या प्रश्नाला कलटी दिली.

अरबाज आणि मलायका यांनी तब्बल १८ वर्षे संसार केला. त्यानंतर वर्षभरापूर्वी ते विभक्त झाले. यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करू लागली. यानंतर अनेक ठिकाणी ते एकत्र दिसू लागले. यानंतर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरु झाल्या. दरम्यान अरबाज देखील विभक्त झाल्यानंतर मॉडेल जॉर्जिया एण्ड्रीयानीला डेट करु लागला. मलायका-अर्जुननंतर आता अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.