मिठाच्या पाण्याचे त्वचेला होतात ‘हे’ 4 आश्चर्यकारक फायदे ! महागड्या प्रॉडक्ट्सलाही कराल Bye-Bye !

पोलिसनामा ऑनलाइन – मीठ हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. ब्लड शुगर नियंत्रित करणं आणि वजन कमी करणं यासाठी मीठाचा खूप फायदा होतो. याशिवाय मीठात कॅल्शियम, सिलिकॉन, सोडियम असे अनेक मिनरल्स असतात. यामुळं याचा केस आणि त्वचा यासाठी खूप फायदा होतो. तुम्हाला केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स वारण्याचीही गरज पडणार नाही. मिठाच्या पाण्याचा वापर आणि त्याचे फायदे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) पिंपल्सची समस्या – मीठाच्या पाण्यातील हिलिंग प्रॉपर्टीज त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला सतत पिंपल्स येण्याची समस्या येत असेल तर यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा मीठ टाका. हे पाणी कापसाच्या मदतीनं प्रभावित झालेल्या भागांवर लावा. कोरडं झाल्यानंतर किंवा सुकल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या.

2) त्वचा एक्सफोलिएट करतं – जर त्वचेवरील मृत पेशी तुम्हाला दूर करायच्या असतील तर एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. मीठाच्या रफ टेक्चरमुळं त्वचा चांगल्याप्रकारे एक्सफोलिएट करण्यास मदत मिळते. थंड पाण्यात मीठ टाकून याची घट्ट पेस्ट तयार करा. मीठाचं प्रमाण अधिक ठेवा. या पेस्टनं आता त्वचेवर हळूहळू मसाज करा.

3) त्वचेची सुरक्षा – मीठात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. त्वचा जर कुठे कापली गेली तर ती ठिक करण्यासाठी यामुळं मदत मिळते. जर मीठाच्या पाण्यानं अंघोळ केली तर शरीरावरील सर्व बॅक्टेरिया मरतात. जर त्वचेवर काही घाव असतील तर तेही भरून निघतात.

4) तजेलदार त्वचेसाठी मिठाचं पाणी – जर तुम्हाला तजेलदार आणि चमकदार त्वचा हवी असेल तर फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही पोषण मिळणं गरजेचं आहे. यासाठी रोज कोमट पाण्यात 1 चमचा मीठ घालून याचं सेवन करा. यामुळं शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते आणि सूज कमी होते. यासोबतच त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.

5) पाय स्वच्छ करण्यासाठी – जर तुम्ही मीठाच्या पाण्यानं पाय स्वच्छ केले तर यामुळं थकवाही दूर होतो. पायांवर असणाऱ्या मृत पेशींना दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं. यासाठी कोमट पाण्यात मीठ टाका आणि त्यात थोडा वेळ पाय ठेवा. नंतर स्क्रब करा. यामुळं पाय चांगले स्वच्छ होतात आणि थकवाही दूर होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.