100 आजारांचं एकच औषध ‘आवळा’ ! नियमित सेवन केल्यास औषधाचीही गरज पडणार नाही, जाणून घ्या 10 आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आवळा एक असं फळ आहे ज्याला 100 गुणांचं औषध मानलं जातं. डॉक्टरही याबद्दल सांगत असतात. आवळ्याला वंडर फूड, अमृत असंही संबोधलं जातं. यामुळं अनेक आजार मुळापासून नष्ट होतात. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. खास करून महिलांच्या आरोग्यासाठी याचा खूप फायदा होतो. जाणून घेऊयात याचे आश्चर्यकारक फायदे.

1) त्वचेवरील डाग – चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. तज्ज्ञदेखील याचा सल्ला देतात. आवळ्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावली तर त्वचा चमकदार दिसते आणि सुरकुत्याही कमी होतात.

2) काळे आणि दाट केस – आवळ्याच्या पावडरने केस धुतल्यानं किंवा नियमित आवळा खाल्ला तर केसांच्या समस्या दूर होतात. याने काळे आणि दाटे केस मिळतात.

3) रक्ताची कमतरता दूर होते – महिलांमध्ये जर रक्ताची कमतरता निर्माण झाली असेल तर आवळ्याच्या ज्युसचे सेवन करावे. याने शरीरात रेड ब्लड सेल्स तयार होतात. रक्ताची कमतरता दूर होते.

4) मासिक पाळीतील त्रास होतो दूर – आवळ्यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन्समुळं मासिक पाळीत महिलांना होणारा त्रासही दूर होतो. कंबरदुखी, पोटदुखी, जास्त ब्लीडींग होणं अशा समस्या दूर होतात.

5) अँटी-आँक्सिडंट – यात अँटी-आँक्सिडंट असल्यानं शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात. फ्री रॅडिक्सचा थेट संबंध हा सुरकुत्या, त्वचेवर डाग आणि वय वाढण्याच्या लक्षणां यांच्याशी असतो.

6) पचनक्रिया सुधारते – यामुळं पचनक्रिया सुधारते. तुम्ही आवळ्याची चटणी, मुरांबा, ज्यूस किंवा चुर्णही असं कोणत्याही रूपात याचं सेवन करू शकता. यामुळं आंबट किंवा करपट ढेकर आणि गॅसची समस्याही लगेच दूर होते.

7) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात फंगल इंफेक्शन आणि बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमता असते. अनेक आजारांसोबत तुम्ही लढू शकते. विशेष म्हणजे शरीरातील विषारी पदार्थही आवळ्यामुळं बाहेर पडतात.

8) डायबिटीजसाठी फायदेशीर – ज्यांना डायबिटीज आहे. त्यांच्यासाठी तर आवळा अमृतासारखाच आहे. आवळ्यात असणारं क्रोमियम हे इंसुलिन हार्मोन्स मजबूत करून शुगर लेवल कंट्रोल करतं. जर तुम्हाला डायबिटीज असेल याचं सेवन करताना आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून त्याचं सेवन करावं.

9) हृदयासाठी फायदेशीर – आवळ्यात असणारं क्रोमियम हे हृदयासाठीसुद्धा खूप लाभदायक असतं. यामुळं तुमचं हृदय अगदी मजबूत आणि निरोगी राहतं. यामुळं बॅड कोलेस्ट्रॉल नष्ट होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल तयार होतं.

10) हाडे आणि डोळ्यांसाठी फायदा – आवळ्याच्या सेवनानं हाडे मजबूत बनतात आणि त्यांना ताकद मिळते. यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त. याचा ज्यूस डोळ्यांसाठी खूप लाभदायक असतो. ज्यांना मोतीबिंदू, कलर ब्लाईंडनेस किंवा कमी दिसण्याची समस्या आहे त्यांनी याच्या ज्यूसचं सेवन नक्की करावं.