Aadhaar Card for Children : लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे अत्यावश्यक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सिम कार्ड घेण्यापासून ते पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड  असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे झाले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे सरकारी योजनां पासून अगदी घरगुती कामकाजासाठी मुलांना आधार कार्डची (children aadhaar card) गरज भासते.

Maharashtra Unlock : नव्या नियमावलीनुसार E-Pass संदर्भातही मोठे बदल, जाणून घ्या

नवजात मुलांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधार कार्ड (children aadhaar card) बनवणे शक्य आहे.
भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) या आधारकार्ड बनवणाऱ्या संस्थेने लहान मुलांना आधारकार्ड बनवण्याची सुविधा दिली आहे.
हे आधारकार्ड सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते सध्या अनेक शाळां मध्ये प्रवेश घेतानाही मुलांना आधारकार्डची आवश्यक भासते.
त्यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याचे नियम काय? याची माहिती समोर आली आहे. बाल आधार बनवण्यासाठी नियम थोडे वेगळे आहेत.

मोदीजी, 7 वर्ष जरी शाळा बंद कराव्या लागल्या तरी हे बलिदान आम्ही देऊ… सोशल मीडियावर वायरल होतोय क्यूट मुलांचा VIDEO

लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याचे नियम हे सर्वसामन्यांपेक्षा वेगळे असतात.
लहान मुलांच्या आधार नोंदणीदरम्यान बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत.
त्याऐवजी त्यांच्या आई-वडिलांची माहिती आणि फोटोच्या आधारे लहान मुलांचे आधारकार्ड तयार केले जाते.
५ वर्षाखालील कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स आणि डोळ्यांचे Pupil विकसित झालेले नसतात.
मूल पाच वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स तपशील घेतले जातात.
बालकांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी त्यासाठी पूर्वी आई-वडिलांचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे.
जर मुलांच्या नोंदणीच्या वेळी पालकांनी नोंदणी केली नसेल तर मुलांचे आधार कार्ड बनवता येत नाही.
त्यामुळे मुलांच्या आधारसाठी पालकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

Pune News : पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार,प्रचंड खळबळ; पोलिस घटनास्थळी दाखल

UP मधील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण बीडमधील मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा होत नाही – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या