तुम्हाला हे माहित आहे ? 2,11,20,29 जन्मतारीख असलेल्यांचा असा असतो स्वभाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्यांची जन्मतारीख 2,11, 20,29 अशी आहे. याचा अर्थ त्यांचा मुलांक 2 आहे. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. या व्यक्ती नेमक्या कशा असतात? याचा विचार करत असाल तर आज आपण तुम्हाला या व्यक्तींचा नेमका स्वभाव कसा असतो? हे सांगणार आहे.

2, 11,20,29 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मुलांक 2 असतो. हा एक स्त्री अंक असल्यामुळे हा मुलांक असलेल्या व्यक्ती या भावूक असतात. त्यांच्या मनात करुणा, दया भाव असतो. अशा व्यक्ती या काहीशा लाजाळू असतात.

अशा व्यक्ती ध्येयवादी असतात. आता इतर मुलांकाच्या तुलनेत यांच्या महत्वाकांक्षा या लहान असतात. मोठी स्वप्न ह्यांना पाहायला आवडत नाही.

ह्यांच्या वाणीवर यांचे प्रभुत्व असल्यामुळे या तारखा असलेल्या व्यक्ती या लेखक असतात. त्यांना लिखाणाच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. चांगली वाणी असल्यामुळे यांच्यात समोरच्या व्यक्तीला समजावण्याची ताकद असते. 2 मुलांक असलेल्या व्यक्ती या भित्र्या असतात. एखाद्या भांडणात त्या पटकन पडत नाहीत.

अशा व्यक्ती मवाळ असल्यामुळे यांचा मित्रांचा गोतावळा हा अधिक असतो. त्यांना कायम मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात राहायला आवडते.

मुलांक 2 असलेल्या व्यक्तींना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडते. एखादी व्यक्ती जाण्याच्या आधीपासूनच उत्साही असेल तर तिचा मुलांक 2 आहे, हे समजून घ्यावे. मुलांक 2 असलेल्या व्यक्ती या सतत विचार करत असतात. सतत विचार करत राहणे त्यांच्या स्वभावदोष आहे.

2 मुलांक असलेल्या पुरुषांसोबत महिलांची मैत्री पटकन होते. अशा पुरुषांकडे स्रिया आकर्षिक होतात.

उत्तम लेखक, शिक्षिका किंवा द्रव्य पदार्थातील बिझनेसमध्ये यांचा हातखंडा असतो. मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा हे काही आजार होण्याची यांना शक्यता असते.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)