‘ब्रेन डेड’ म्हणजे नक्की काय ? जाणून घा कोमात जाणं अन् ब्रेन डेड यातील फरक काय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ब्रेन डेड होणं हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की, ब्रेन डेड म्हणजे नक्की काय आहे. कोमात जाणं हेही आपण अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. ब्रेन डेड म्हणेज नक्की काय आणि कोमात जाणं व ब्रेन डेड यात काय फरक असतो याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ब्रेन डेड म्हणजे काय ?

ब्रेन डेड म्हणजे अशी स्थिती असते ज्यात मेंदू शरीराला प्रतिसाद देत नाही. यात शरीराची हालचाल, डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल आणि श्वास घेण्याची प्रक्रिया ही काही प्रमाणात बंद होते. या स्थिती फक्त मेंदूनंच काम करणं थांबवलेलं असतं. इतर अवयव जसे की, हृदय, लिव्हर किडनी यांचं कार्य मात्र सुरू असतं. याचा अर्थ असा की, व्यक्तीचं शरीर जिवंत असतं, फक्त त्याला संवेदना जाणवत नाहीत.

ब्रेन डेडनंतर काय होतं ?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला ब्रेन डेडची समस्या येते तेव्हा त्याचे रेस्पिरेट्री फंक्शन्स नियंत्रणात नसतात. त्यामुळं अशा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणं, शारीरिक विधी बंद होणं, कितीही वेदना होत असल्या तरी जाणीव न होणं अशा समस्या जाणवतात.

म्हणून ब्रेन डेड झाल्यावर रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवलं जातं

आपल्या मेंदूचे एकूण 3 भाग असतात. ब्रेन स्टेम हा मिड ब्रेन म्हणजेच मेंदूच्या मधला भाग असतो. या ब्रेन स्टेममार्फत बोलण्याची, पापण्या हलवण्याची, चालण्याची, एक्सप्रेशन देण्याची क्रिया होत असते. जर एखाद्याला ब्रेन डेडची समस्या उद्भवली तर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवलं जातं. जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही.

ब्रेन डेड झालेली व्यक्ती किती काळ जिवंत राहते ?

तज्ज्ञ सांगतात की, ब्रेन डेड झालेली व्यक्ती ही काही तास किंवा काही दिवस जिवंत राहू शकते. काही वेळा या स्थितीतून बाहेर पडणंही शक्य असतं. ब्रेन डेडचं कारण काय आहे यावर तो व्यक्ती बरा होईल किंवा नाही हे अवलंबून असतं.

ब्रेन डेडची कारणं काय ?

ब्रेन डेडची अनेक कारणं असतात. औषधांचा ओव्हर डोस, घातक ब्रेन इंफेक्शन (मेनिनजायटीस), मासनकि आजार किंवा साप चावणं अशा अनके कारणांमुळं हा आजार होऊ शकततो.

कधी कोमात जाते व्यक्ती ?

जर एखादी व्यक्ती डोक्यावर पडली किंवा रस्त्यावर अपघात होऊन डोक्याला तीव्र जखम झाली तर संबंधित व्यक्ती कोमात जाऊ शकते. अशा केसमध्ये मेंदूत रक्तस्त्राव होतो किंवा सूज येते.

ब्रेन डेड आणि कोमात रिकव्हरीची शक्यता किती असते ?

वर सांगितल्या प्रमाणे काही कारणांमुळं जर ब्रेन डेड झाला असेल तर यातून रिकव्हर होण्याची शक्यता असते. कारण जेव्हा याचा प्रभाव कमी होतो तेव्हा ब्रेन पुन्हा व्यवस्थित काम करू लागतो. जेव्हा व्यक्ती कोमात जाते तेव्हा रिकव्हरी शक्यता जास्त असते. याच्या तुलनेत ब्रेन डेड मध्ये रिकव्हरीची शक्यता कमी असते. तपासणी दरम्यान कोमात गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांची बुबुळं प्रतिसाद देत असतात. परंतु ब्रेन डेड झाल्यानंतर शरीर आणि मेंदू प्रतिसाद देत नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.