शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसुख हिरेन प्रकरणामुळे राज्याचे राजकारण चांगलच तापलं आहे. या प्रकरणावरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली तर परमबीर सिंह हे नाराज असून त्यांनी नूतन पदभार न घेता ते रजेवर आहेत. या प्रकरणावरून सर्व तपास एनआयए पथकाने घेतला आहे. तर यावरून शिवसेनेनेच आता NIA वर प्रश्न उपस्थित करत, सामनामधून NIA आणि केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.

तर, दहशतवादाबाबतीतील प्रकरणाचा तपास हा NIA करते. मात्र, या जिलेटीनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या NIA ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते संशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली ? हेही रहस्यच आहे, असे शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेने मुंबई पोलिसांच खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचाही आरोप केला आहे.

तसेच शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून असे म्हटले आहे की, भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झालं आहे. ‘मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘NIA ने घाईगडबडीत अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास हाती घेतला. राज्य सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच पुढं येईल. कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी ‘NIA ‘ने घुसावे हा काय प्रकार आहे? मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘NIA ‘साठी मोठा आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे, असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

मावळते मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह नाराज ?
राज्य शासनाने अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेतल्याने नाराज झालेले परमबीर सिंह हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंह हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक गाडी, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंह अडचणीत आले आहेत. आयुक्तपदावरुन त्यांची बदली करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणावरून त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. असे समजते.