‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  लवकरच बिहारची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षाकडून चांगली तयारी करण्यात येत आहे. कोरोना आणि लॉकडाऊन या मधील हि पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. यातच आता बहुजन विकास आघाडीकडून बिहार निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. जे महाराष्ट्रात नाही होऊ शकलं ते बिहारच्या निवडणुकीत होऊ शकत असे बोलत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला साद घातली आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले , देशभरात नवीन राजकीय समीकरणानां सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात एमआयएम आणि वंचितने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली त्यात एक जागा मिळवण्यात यश आले. पण विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावर थोडा गोंधळ झाला एमआयएम १०० जागा लढवणार यावर असून बसली त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आता बिहार निवडणूका जवळ आल्या आहेत जे महाराष्ट्रात झाले नाही ते बिहार मध्ये होऊ शकते. बिहारमध्ये मुस्लिम,आंबेडकरवादी आणि आदिवासी यांची मिळून एकूण ४० टक्के लोकसंख्या आहे. इतक्या मोठ्या जनाआधाराने कोणतेही सरकार पाडू शकता. हे सरकार नागरिकता आणि आरक्षणाच्या विरोधात आहे. मौलवी, मौलाना यासह जे शिक्षित मुसलमान आहेत त्यांनी याबाबत विचार केला पाहिजे. आपण जर सगळे एकत्र आलो तर येणाऱ्या निवडणुकीत आपण सरकारदेखील पाडू शकतो. येणाऱ्या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार

बिहार निवडणूक तोंडावर आली असताना निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडून बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली. बिहार विधानसभेची निवडणूक ३ टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे तर १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाल २९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रकिया २९ नोव्हेंबर पूर्वीच पूर्ण होणार आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा २८ ऑक्टोबर,दुसरा टप्पा ३ नोव्हेंबर रोजी तर तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर १० नोव्हेंबर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच कोणते सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. बिहार निवडणूक दिवाळीपूर्वी असल्याने मतदार आणि उमेदवार यांची दिवाळी साजरी होणार आहे. संपूर्ण देशभरात १४ नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरुवात होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like