‘कोरोना’ इन्फेक्शन झालयं की सामान्य घसादुखी ? ‘या’ पध्दतीनं ओळखा फरक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईनः पूर्वी घसादुखी, सर्दी, खोकला झाला तरी लोक निश्चित राहत असत. पण कोरोना संपूर्ण देशात पसरला तसे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आता घसादुखी, सर्दी, खोकला झाल्यास लोकांच्या मनात सगळ्यात आधी कोरोनाची भीती येते. पण घश्यातील सामान्य वेदना की घसादुखी यातील फरक कसा ओळखायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घशादुखीची सामान्य कारणे
घश्यात वेदना होणे हे खूप सामान्य लक्षण आहे. श्वसन प्रणालीची एलर्जी, इन्फेक्शन घसादुखीचे कारण ठरू शकते. याबाबत डॉक्टर दिपेश महेंद्र म्हणाले, श्वसनप्रणालीवर आक्रमण करत असलेल्या व्हायरसेसमध्ये इनफ्लुएंजा व्हायरस, ऐप्सटीन, एडिनोव्हायरस यांचा समावेश आहे. कधी कधी घश्यातील वेदना, एलर्जी, सुका खोकला एअर कंडिशनिंगमुळे होतात. प्रदूषणामुळे हवेत आढळणारे धुळीचे कण, तंबाखूचे सेवन यांमुळे गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लेक्स आदी आजार होऊ शकतात. फ्लू, स्ट्रेप्टोकोकल व्हायरस आणि कोविड- 19 मुळे होत असेलेल्या समस्यांमध्ये समानता दिसून येते. यासगळ्या प्रकारच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजणे, मासपेशींतील वेदना , शरीरातील वेदना, डोकेदुखी आणि थकवा यांचा समावेश आहे.

1)डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,फ्लूच्या लक्षणांची वैशिष्टय म्हणजे फ्लूची लक्षण वेगाने जाणवतात आणि उपचारांनंतर लगेच प्रभाव कमी होऊ लागतो. कोरोनाची लक्षण तुलनेने कमी वेगाने दिसून येतात. अनेकदा तीव्रतेनेही दिसून येतात.

2) एखाद्याला सामान्य घश्याचा त्रास आहे. त्यांना घश्यात वेदना होणे, खाज येणे, गिळायला त्रास आदी समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे सुजलेले टॉन्सिन्स लाल होतात. घश्याच्या समोरील लिंफ नोड सुजलेले असतात. त्यामुळे त्रास वाढतो.

3) तुमच्या टॉन्सिल्सवर पांढऱ्या रंगाचे पॅच येऊ शकतात. त्यामुळे आवाज बसू शकतो. पण घश्यातील सामान्य समस्यांमुळे कफ किंवा छातीत दुखण्याची समस्या उद्भवत नाही. भारतात 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोविड 19 च्या इन्फेक्शच्या केसेसमध्ये अशी लक्षणे दिसून आले आहेत.

4) भारतात 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोविड-19 च्या इंफेक्शन्समध्ये दिसून आले आहे की, घश्यात खाज येणे, जखम झाल्याप्रमाणे भासते. पण यातील फरक ओळखता येऊ शकतो कारण वाढते लिंफ नोड आणि सुजलेले टॉन्सिल्स, श्वासांची दुर्गंधी आणि खराब आवाज साधारणपणे कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिसून येत नाही.

हवामानातील बदल आणि फ्लूमुळे देखील घशात वेदना होतात
आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्रासाचा सामना करावा लागत असेल तसेच वास घेण्याची क्षमता, चव नाहीशी झाली आहे तर त्यापैकी एक लक्षणे देखील दर्शविते की आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो. केवळ घसा खवखवणे हे दर्शवित नाही की आपल्यला कोरोना झाला आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, हवामानातील बदल आणि फ्लूमुळे देखील घशात वेदना आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो.