‘स्वाक्षरी’मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या चिन्हांचा काय अर्थ असतो ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

१) काही जण सहीमध्ये गरज नसताना अतिरिक्त माहिती लिहितात. जसे एखादी विवाहित स्त्री सहीमध्ये ‘सौ’ लिहिते, किंवा एखादा डॉक्टर सहीमध्ये ‘dr’ लिहितोय किंवा एखादा आर्मीतील कर्नल व्यक्ती सहीमध्ये ‘col’ लिहितोय या सगळ्यांचा अर्थ असा होतो, की त्या व्यक्तीला त्या गोष्टींचा असण्याचा अधिक अभिमान आहे आणि ही गोष्ट वेळेचा अपव्ययपण दर्शवते.

2) काही सह्यांमध्ये वेगवेगळी कलाकृती (drawings) दिसून येते. एखादा बासुरी वाजविणारा सहीमध्ये बासुरीचे चिन्ह काढतो किंवा एखादा गुंड व्यक्ती सहीमध्ये बंदूक /चाकू काढतो, याचा अर्थ असा होतो की अशी लोकं त्या गोष्टीशी आपण अत्यंत जवळ आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात.

3) काही जण सहीमध्ये मजेशीर चित्र (smilies) काढतात. याचा अर्थ असा होतो की, ते जगाला आपण फार आनंदी आहोत असा दाखविण्याचा प्रयत्न करतात; परंतु आतून ती व्यक्ती खचलेली असते आणि खूप एकटी असते.

4) काही जण सहीच्या खालती ‘√’ (right) मार्क करतात. याचा अर्थ असा होतो, की अशा व्यक्तीची निर्णय क्षमता चांगली असते व घेतलेल्या निर्णयावर ती लोकं ठाम असतात.

5) काही जण सहीच्या खाली दोन रेषा (line) एकत्र करून विमानासारखे चिन्ह काढतात. अशा लोकांना आयुष्यात प्रत्येक कामात खूप नीटनेटकेपणा, संपूर्ण कौशल्य (perfection) लागते.

6) काही जण सहीच्या खाली पर्वतासारखे उलटे U सारखा चिन्ह काढतात. अशी व्यक्ती आयुष्यात खूप पैसे कमवतात आणि उच्च शिखर गाठतात.

7) काही जण तेच पर्वतासारखे चिन्ह त्रिकोणासारखे ‘∆’ काढतात. यांची प्रगती फार लवकर होते, परंतु त्यापेक्षाही जास्त गतीने अधोगती होते.

8) जर एखादा व्यक्ती सहीच्या खाली बाण काढत असेल, तर अशी व्यक्ती कायदेशीर अडचणीत अडकतात आणि कर्जबाजारीपण होतात.

9) काही व्यक्ती सहीच्या पुढे माघे किंवा कुठेही स्टार ‘★’ चे चिन्ह बनवतात. अशी लोकं इतरांना प्रभावित (impress) करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी दाखवतात; परंतु खऱ्या आयुष्यात त्यांची सुरुवातीला तर प्रगती होते; परंतु अधोगती फार जलद होते.

तुमचे सहीबद्दल /लोगोबद्दल असणाऱ्या प्रश्नांचे आम्ही स्वागत करतो. असे सर्व प्रश्न नवनीत क्रिएशन (NAVNEET CREATION) च्या फेसबुक पेजवर किंवा YOUTUBE चॅनेलवर कमेंटमध्ये विचारावेत, ही विनंती.

 

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः

You might also like