सावधान ! गॅस सिलेंडर वेळाेवेळी ‘लीक’ होताेय तर ‘या’ गोष्टींची काळजी अवश्य घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेवण करण्यासाठी भारतातील घरामध्ये एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. अनेक वेळी आपणास हे कळतंच असते कि गॅस लीक झाला किंवा किंवा गॅस लीक झाल्यानंतर काळजीपुर्वक जबाबदारी घेतली नाही म्हणुन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अनेकदा व्यवस्थित काळजी न घेतल्याने सिलेंडरचे स्फोट घडुन येतात. दरम्यान यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवण्याची वेळ येते. तर आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर लीक झाल्यानंतर काही महत्वाचे उपाय सांगणार आहोत. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही आणि समस्या दुर करण्यासाठी मदत होईल.

या गोष्टींबाबत सावधान – 
गॅस कनेक्शन घेतल्यानंतर संबंधित एजंसीच्या व्यक्ती गॅसचा वापर करताना कोणत्या गोष्टींबाबत सावधान बाळगणे गरजेच असते त्याबाबत माहिती देत असतात. ही माहिती घरातील सर्व व्यक्तींनी व्यवस्थित ऐकुन त्यानुसार सावध राहणे गरजेचे असते. त्यामुळे गंभीर परिस्थितीत उपाय करणे फायदेशीर ठरतं.

गॅसचा वास येत असेल तर सर्वात आधी शांत रहा आणि पॅनिक होऊ नका.

चुकूनसुद्धा घरातील किंवा किचनमधील इलेक्ट्रीक स्विच किंवा अप्लायंसेस ऑन करु नका.

किचन आणि घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडा.

रेग्युलेटर चेक करा ऑन असेल तर लगेच बंद करा.

रेग्युलेटर चेक केल्यानंतरही गॅस लिक होत असेल तर रेग्युलेटर काढुन सेफ्टी लावा.

नॉब व्यवस्थीत चेक करा .

गॅसचा वास बाहेर घालवण्यासाठी पंखा अजिबात सुरु करु नका.

घरात जर अगरबत्ती किवा दिवा सुरु असेल तर ते विझवून टाका.

त्याबाबत माहिती घेण्यासाठी आपल्या डिलरशी संपर्क करा.

गॅसच्या कारणामुळे डोळे जळजळत असतील तर डोळे चोळु नका.त्याऐवजी थंड पाण्याने डोळे धुवुन टाका.

तुम्हाला जर आरोग्याच्या समस्यांचा सामना टाळायचा असेल तर तोंडावर कपडा बांधुन ठेवा, त्यामुळे श्वासावाटे शरीरामध्ये गॅस जाणार नाही.

अशा वेळी खास करुन मुलावर लक्ष ठेवा, त्यांना गॅस आणि इलेक्ट्रीक स्विचपासुन दुर ठेवा.

आग लागली तर
आग लागली तर कापड भिजवून गॅस वर टाका. जर प्रकरण हाताबाहेर गेलं तर त्वरित अग्निशमन दलाला कळवा. जास्तीत जास्त जीवित आणि वित्त हानी टाळण्याचा प्रयत्न करा. जर बिल्डिंग मध्ये राहत असाल तर शेजारच्यांनाही गॅस लीक ची कल्पना द्या.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

You might also like