home page top 1

ज्या पुरुषांच्या छातीवर अधिक केस आहेत त्यांनी ‘हे’ नक्कीच वाचा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपण अनेक पुरुष असे पाहतो ज्यांच्या अंगावर खूप केस असतात. ज्या पुरुषांच्या छातीवर केस असतात त्यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्याचा उल्लेख ज्योतिषात केला आहे. तुमच्या छातीवर देखील केस असतील तर तुम्ही हे नक्की वाचा. शास्त्रातही याबाबत अनके गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आज छातीवर जास्त केस असणाऱ्या व्यक्तींबाबत आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

ज्या पुरुषांची छाती रुंद असते आणि त्याच्या छातीवर केस असतात असे पुरुष जास्त धनवान आणि वैभवशाली असतात असे मानले जाते. असे पुरुष खूपच मेहनती असतात असेही सांगण्यात आले आहे.

शास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते खूप सभ्य स्वभावाचे असतात. असे पुरुष अधिक उदार आणि भावूक प्रवृत्तीचे असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जास्त केस असतील तर असे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि बलशाली असतात असे म्हटले जाते. असे पुरुष पत्नीला खूप खुश ठेवतात. अशा पुरुषांचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम असतं.

असेही म्हटले जात आहे की, ज्या पुरुषांच्या छातीवर कमी केस असतात असे पुरुष धनवान, बुद्धिमान, विद्याप्रेमी आणि संगीतकार होऊ शकतात. इतकेच नाही तर अशा व्यक्तींना आपल्या पत्नीचा जास्त राग येतो. असं मानलं जातं की, असे लोक आपल्या पत्नीवर जास्त प्रेमही करत नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like