काय सांगता ! ‘बाहुबली’ प्रभासनं नाकारली होती 5000 मुलींच्या लग्नाची ‘स्थळं’

पोलिसनामा ऑनलाइन –साऊथचा स्टार प्रभास यानं जसं बाहुबली सिनेमात काम केलं तो रातोरात सुपरस्टार झाला. तेलगु आणि तमिळ सिनेमात स्टार असणारा प्रभास जगभर फेमस झाला. त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

बाहुबली हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर मुली त्याच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. यानंतर त्याला लग्नासाठी अनेक प्रपोजल येऊ लागले. प्रभासला जवळपास 5000 प्रस्ताव आले होते जे त्यानं नाकारले होते. यानंतर अशाही काही अफवा समोर होत्या की, प्रभास अमेरिकेतील उद्योगपतीच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. यावेळी मात्र प्रभासनं मौन पाळणच पसंत केलं.

या सगळ्यात प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्याही आतापर्यंत खूप चर्चा झाल्या आहे. बाहुबली 2 त्यांनी केलेलं काम साऱ्यांनाच आवडलं. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. प्रबास आणि अनुष्काबद्दल सांगायचं झालं तर जवळपास 10 वर्षांपासून दोघांची मैत्री आहे. 2009 साली आलेल्या बिल्ला या सिनेमात प्रभास आणि अनुष्कानं एकत्र काम केलं आहे.

इंडस्ट्रीत गेल्या 14 वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या प्रभासची खास बात अशी की, 14 वर्षांच्या करिअरमध्ये त्यानं फक्त 19-20 सिनेमात काम केलं आहे. तो वर्षाला एखादाच सिनेमा करतो. पण त्याचे सिनेमे खूप गाजतात.