काय सांगता ! ‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटियाच्या खासगी विमानात विराट कोहलीच होता का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा सोशल मीडिया मध्ये चर्चेत आली आहे. आतातर इन्स्टाग्रामवरील युझर्स थेट तिला विराट कोहली च्या नावावरून प्रश्न विचारत आहेत आणि याला कारण ठरलय तिने शेअर केलेला विमानातील एक फोटो. या फोटोमुळे अनेक इन्स्टाग्राम युझर्स तिच्यावर प्रश्नांचा वर्षाव करत आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, विराट कोहली आणि तमन्ना भाटियाचं नेमकं कनेक्शन तरी काय? आणि विमानात ते एकत्र कसे आले?

तमन्नाने तिच्या खासगी जेटमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोत तमन्नाच्या हातामध्ये एक ट्रे असून, तो स्नॅक्सने भरलेला आहे. तमन्ना ज्या सीटवर बसलीय, तिच्यामागे तिचे मेक-अप आर्टीस्ट फ्लोरीयन ह्युरेल आणि निलम केनिया आहेत.

‘Breakfast please… 🍟🍪🍬 Featuring @florianhurel and @nilamkenia’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. फ्लोरीयनची चेहरेपट्टी क्रिकेटपटू विराट कोहलीशी मिळती-जुळती आहे असे दिसते.