काय सांगता ! होय, अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यातले काही हिट ठरले तर काही फ्लॉप. त्याच्या काही भूमिका विशेष गंजून देखील त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बऱ्याच वेळा अभिषेकला महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्यामुळे ट्रोल केले जात होते ज्यामुळे त्याने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण सुदैवाने तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्याला सल्ला दिला होता.

अभिषेक म्हणाला, ‘एक वेळ अशी होती की मला सारखे वाटायचे ही फिल्म इंडस्ट्री माझ्यासाठी बनलेली नाही. पब्लिक प्लॅटफॉर्मवर अयशस्वी होणे हे खूप कठीण आणि त्रासदायक असते. तेव्हा तर मी सोशल मीडियावर पण नव्हतो. पण मीडियाद्वारे मला कळायचे की काही लोकं माझ्या अभिनयावर भयंकर टीका करातात, अपशब्द वापरतात आणि मला अभिनय जमत नाही असे त्यांना वाटते’.

पुढे अभिषेक असं म्हणाला, ‘तेव्हा मला जाणवू लागले की मी चुकीचे प्रोफेशन निवडले आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी मी इथे काम करु शकत नाही. तेव्हा मी माझ्या वडिलांकडे गेलो आणि त्यांना बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले की मी तुला सोडून जाणारा व्यक्ती होण्यासाठी लहानाचे मोठे केलेले नाही. एक अभिनेता म्हणून तू प्रत्येक चित्रपटात काम करत स्वत:ला सिद्ध करुन दाखवत आहेस.’ अमिताभ यांनी सल्ला दिल्यानंतर अभिषेकने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय बदलला.

नुकताच अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.