काय सांगता ! होय, प्रेग्नेंट असल्याचे समजताच प्रचंड हैराण झाली होती मंदिरा बेदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीने १९९४ मध्ये टीव्ही सीरियल ‘शांती’ पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेत मंदिराला एक खास ओळख मिळाली. इतकेच नाही तर मंदिरा हे नाव घराघरात पोहोचले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. मंदिराचा जन्म १९७२ साली कोलकाताला झाला. मात्र तिचे शिक्षण मुंबईतून झाले. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आज ती आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

तर मंदिराच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी संबंधीत काही खास गोष्टी…
मंदिर बेदी इथंवरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. काही वर्षापूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की वयाच्या ३९ व्या वर्षी ती आई झाली. २०११ मध्ये तिने आपल्या मुलास जन्म दिला. ती ज्या प्रोजेक्टसाठी काम करत होती त्यांच्यासोबत तिचा करार झाला होता. तिला भीती होती की जर ती प्रेग्रेंट राहिली तर तिचं करिअर संपेल.

पुढे ती म्हणाली, मनोरंजन जगात महिलांचा करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना होती. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. मंदिरा बेदीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा फक्त ती २० वर्षांची होती. या क्षेत्रात आपलं विशेष स्थान मिळविण्यासाठी तिने खूप धडपडत केली होती.