काय सांगता ! होय, नवर्‍यासोबत झोपलेल्या महिलेवर तरूणाकडून बलात्कार, पिडीता म्हणाली – ‘मला वाटलं तो माझा पती’; पोलिस चक्रावले

रीवा/मध्य प्रदेश : वृत्तसंस्था –  मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. रावा जिल्ह्यातील मउंगज भागात एका महिलेवर तरुणाने बलात्कार केला. मात्र, महिलेला पती असल्याचे वाटल्याने तिने त्याला विरोध केला नाही. मात्र, तिला संशय आल्याने तिने आरडा ओरडा केला असता तरुण पळून गेला. या घटनेमुळे पोलिस देखील चक्रावले आहेत.

महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती रात्री पतीजवळ झोपलेली असताना एक तरुण आला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेने सांगितले की, तिला वाटलं की तरुण तिचा पती आहे. त्यामुळे तिने त्याला आडवलं नाही. जेव्हा तिला याबाबत समजलं त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तोपर्यंत तो तरुण पळून गेला.

पीडित महिला, तिचा पती आणि पाच वर्षाचा मुलगा एका झोपडीत राहतात. रात्री ती पती आणि आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत झोपली होती. तेव्हा रात्री एक तरुण झोपडीत आला आणि त्याने अंधाराचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. पहिल्यांदा तिला आपला पतीच असेल असे वाटले. मात्र नंतर तिला जाणीव झाली की पती तर झोपला आहे. तेव्हा तिला या घटनेबाबत समजले, असे महिलेने पोलिसांना सांगितले.

पत्नीच्या आवाजाने पती झोपेतून जागा झाला. त्याने त्या तरुणाला पकडले. पण त्याने हाताला झटका देऊन पसार झाला. सकाळी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ती रहात असलेली जागा फारच छोटी आहे. याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. मात्र पोलिसांना याचा संशय असून झोपलेल्या जागेवर पत्नीवर बलात्कार होत होता आणि पतीला काहीच कसं समजलं नाही.