काय सांगता ! होय, महसूल विभागानं जप्त केलेली वाहने गोदामातून गेली चक्क चोरीला, FIR दाखल

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   शिरूर तालुक्यातील महसूल विभागाने कारवाई करत जप्त केलेली वाहने तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामातून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .याबाबत महसूल विभागाकडून शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरुरच्या तहशिलदार लैला शेख, नायब तहसीलदार श्रीशैलेश वट्टे व त्याच्या पथकाने वाळू माफियावर जोरदार कारवाई सुरवात केली आहे. तर चार दिवसापुर्वी नायब तहशिलदार यादव आणि तलाठी बराटे यांनी तळेगाव ढमढेरे परिसरामध्ये MH16AE 9822 व MH12 HD 7855 या

विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावरती कारवाई करत ही वाहने जप्त करत तळेगाव ढमढेरे येथील धान्य गोदामात लावण्यात आली होती .तर पाबळ चे मंडलधिकारी पी एम खोलम व केंदूरचे घोडे तलाठी यांनी देखील MH 14CP 7089 व MH 12 QG 1354 या वाहनावरती कारवाई करत दोन वाहने जप्त करत शासकीय धान्य गोदामात आणून लावली होती. मात्र वरील सर्व वाहने १४ जुलैला राञीच्या सुमारास गोदामाचे कुलूप तोडून अन्यात व्यक्तीने ही वाहने चोरीला नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत महसूल विभागाने इतरञ चौकशी केली असता ही वाहने आढळून नआल्याने अखेरीस शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये महसूल विभागाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आले पुढील तपास शिक्रापुर पोलीस करत आहेत. माञ याबाबतीत शिरुर तालुक्यात महसुल विभागाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.