यकृताचा आकार वाढणं म्हणजे काय ? ‘ही’ त्याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन

यकृताचा आकार वाढणं म्हणजे काय ?

 

साधा व्हायरल संसर्ग किंवा गंभीर वैद्यकीय स्थिती जसे की, हृदय निकामी पडणं अशा स्थितीत यकृताचा आकार वाढतो. याला हेप्टोमेगली असा शब्द वापरला जातो. सहसा मूळ कारणांचा उपचार केला तर हेप्टोमेगली बरं करण्यास मदत होते.

काय आहेत याची लक्षणं ?

– पोटात दुखणं
– मळमळ
– कावीळ
– थकवा किंवा अशक्तपणा

काय आहेत याची कारणं ?

– यकृताचे रोग
– ॲमिओबिक ॲबस्केसिस
– हेपेटायटीस
– सिरोसिस
– चरबीयुक्त यकृत
– हेमोक्क्रोमेटोसिस
– लिव्हर सिस्ट
– यकृताच होमांजिओमास
– पित्ताशयात अडथळा
– ॲमिलायोडोसिस
– विल्सना रोग

काही इतर रोग पुढीलप्रमाणे –

– यकृताचा कर्करोग
– लिम्फोमा
– ल्युकेमिया
– हृदय निकामी पडणं
– पेरीकार्डिटीस
– मलेरिया आणि टायफॉईड

काय आहेत यावरील उपचार ?

याचे उपचार त्याच्या कारणांवर असू शकतात.

– संसर्गानं असं होत असेल तर अँटीबायोटीक्स दिले जाऊ शकतात.
– जर हृदयाचा आजार असेल तर मूळ आजारावर उपचार करणं आवश्यक आहे.
– कधी कधी तर ते आपोआप बरे होऊ शकतात.
– कधी कधी केवळ काही सहायक एंझाइमची गरज भासू शकते.
– जर कर्करोगामुळं वाढ झाली असेल तर शस्त्रक्रिया किंवा किमो रेडिएशन थेरपीची आवश्यकता भासू शकते.