शरद पवारांना ‘नेमकं’ काय साध्य करायचंय ! देशभरातुन विचारला जातोय ‘प्रश्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाठिंबा पाहिजे असेल तर, केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन अगोदर एनडीएमधून बाहेर पडा अशी अट शिवसेनेला घालण्यात आली होती. त्याप्रमाणे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व सोनिया गांधी यांच्याशी फोनवर संपर्क साधूनही राष्ट्रवादी काँग्रेसने व त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले नाही. त्यामुळे आता शिवसेना तोंडघशी पडली आहे. या सर्व प्रकारानंतर शरद पवार हे नेमके काय करु इच्छितात की नेहमीप्रमाणे भाजपाला सोयीचे होईल, असे राजकारण करणार असा प्रश्न राज्यभरातून विचारला जात आहे.

शिवसेनेला सोमवारी सायंकाळपर्यंत ते सत्ता स्थापन करण्यासाठीचे आवश्यक समर्थन सिद्ध करण्याची अट राज्यपालांनी घेतली होती. त्यानुसार शिवसेनेच्या दिवसभर हालचाली सुरु होत्या. उद्धव ठाकरे यांनी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर संजय राऊत हेही होते. गेल्या चार पाच दिवसात राऊत यांनी किमान दोन ते तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत नेमके काय ठरले. शरद पवार यांनी ठाकरे यांना नेमके काय सांगितले. या बैठकीनंतर संजय राऊत यांच्या तणाव वाढला व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर नंतर शस्त्रक्रियाही करण्यात आली.

या बैठकीत शरद पवार यांनी ठाकरे यांना नेमके काय सांगितल. हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका झाल्या. काँग्रेस भूमिका स्पष्ट करीत नाहीत, तो आपली भूमिका जाहीर करायची नाही, असे पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. शिवसेनेला पाठिंबा देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील नेत्यांनी सांगितल. व काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सोनिया गांधी व इतरांना राजी केले होते.

तेव्हा पाठिंब्याचे पत्र देण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी काल सायंकाळी ६ वाजता शरद पवार यांच्याशी १५ मिनिटे फोनवरुन चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांनी सरकार बनविण्यासाठी अजून काहीही स्पष्ट झालेले नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार बनविण्याचा असा कोणताही प्रस्ताव आला नाही. शरद पवार यांच्या या सांगण्यामुळे सोनिया गांधी हैराण झाल्या. तेव्हा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना सांगितले की, आपण पुन्हा शिवसेनेशी चर्चा करु़ त्यानंतर काँग्रेसने पाठिंब्यांचे पत्र देण्याचा घेतलेला निर्णय बदलला व काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईत जाऊन शरद पवार यांच्याशी पुन्हा चर्चा करुन मग निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविले, अशी माहिती सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरविले असताना शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना अजून काही ठरले नसल्याचे का सांगितले. जर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार इच्छुक असताना शिवसेनेला वेळेत पाठिंबा न देण्यामागे नेमके काय कारण आहे.

पाच वर्षापूर्वी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणालाही न विचारता व निकाल पूर्ण लागण्याअगोदरच शरद पवार यांनी भाजपा पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेला पाच वर्षे भाजपाबरोबर रडत खडत जावे लागले होते. शिवसेनेला संपविण्यासाठीच शरद पवार यांनी मागच्यावेळेप्रमाणे हा डाव खेळला का? शरद पवार नेमके काय करु इच्छितात असा प्रश्न आता देशभरात विचारला जाऊ लागला आहे.

Visit : Policenama.com