श्वसनाचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’, अन् ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम

श्वसनाचा त्रास म्हणजे काय ?

जेव्हा एखाद्याला ऑक्सिजन शरीरात घेण्यास त्रास होतो किंवा अस्वस्थ वाटतं तेव्हा त्याला श्वसनाचा त्रास असतो असं म्हटलं जातं. इतरवेळी ते सौम्य असते. परंतु न्युमोनिया सारख्या केसमध्ये हा त्रास गंभीर असू शकतो.

काय आहेत याची लक्षणं ?

– आडवे झोपल्यावर श्वास घ्यायला त्रास होणं
– श्वासोच्छ्वास करताना आवाज येणं (घरघर)
– खूप थंडी वाजून खोकला येणं आणि खूप तापण येणं
– ओठ आणि बोटे निळे पडणे
– चक्कर येणं
– पावलं आणि घोट्यावर सूज येणं

काय आहेत याची कारणं ?

– चिंता आणि एकदम घाबरून जाणं
– ट्रॅकिया आणि ब्राँकायसोबत वायुमार्गाच्या काही भागात समस्या येणं.
– अॅलर्जी
– शारीरिक तंदुरुस्ती कमी होणं
– फुप्फुसाचे विकार जसे की, दमा, न्युमोनिया होणं
– ज्या व्यक्तीचं हृदय पुरेसं रक्त पंप करून ऑक्सिजन पुरवू शकत नाही त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या येते.

काय आहेत यावरील उपचार ?

1) पर्स्ड – लीप श्वासोछ्वास – या तंत्रात व्यक्तीला तोंडातून किंवा नाकातून श्वास घेण्यास सांगितलं जातं. शिट्टी वाजवताना ओठ जसे असतात तसे यात ठेवले जातात (पर्सिंग द लिप्स). यानंतर फुप्फुसातील सर्व हवा बाहेर काढण्यासाठी श्वास बाहेर सोडला जातो.

2) पोझिशनिंग – दम लागल्यानंतर या तंत्राचा वापर केला जातो. कारण स्नायू शिथील असताना श्वास घेणं सोपं होतं. पायऱ्या चढताना ते वापरले जाते. यात खालील गोष्टी केल्या जाऊ शकतात.

– भिंतीला टेकून विश्रांती घेतल्यानंतर आपण आपले हात आपल्या मांड्यांवर ठेवावे आणि समोरच्या बाजूला वाकावं ज्यामुळं छातीला आणि खांद्याला आराम मिळतो.

– अशा प्रकारे जेव्हा ते मुक्त होतात तेव्हा आपल्याला श्वास घेण्यास मदत होते. त्यानंतर पर्स्ड लीप श्वासोच्छ्वास केला जाऊ शकतो.

3) जलद गतीनं श्वासोच्छ्वास – चालताना किंवा जड वस्तू उचलताना हे तंत्र वापरलं जातं. कारण यामुळं दम लागणं थांबतं किंवा कमी होतं.

– चालताना स्थिर उभं राहून श्वास आत घ्यावा. काही पावलं चालून श्वास सोडावा. थोडी विश्रांती घेऊन परत असं करा.

– समान चालताना काही सामान उचलत असताना ती वस्तू शरीराच्या जवळ पकडून चालावं. ज्यामुळं श्रम कमी लागतात. सामान उचलण्याआधी दीर्घ श्वास घ्यावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.