‘फॉलिक्युलिटिस’ समस्या नेमकी काय ? जाणून घ्या लक्षणं अन् कारणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   फॉलिक्युलिटिस हा एक सामान्य त्वचेचा संसर्ग आहे. त्यामध्ये त्वचेवरील रोमछिद्रांवर सूज येते. सामान्यतः दाढी, आर्म्सपीट, पाठ, कंबर आणि पायांवर हा संसर्ग उद्भवतो. सुरुवातीस लाल रंगाची पुरळ येते किंवा पिंपल येतो. त्यानंतर मग हळूहळू हा संसर्ग संपूर्ण शरीरावर पसरु शकतो. हा संसर्ग जास्त गंभीर स्वरुपाचा नसला तरी याने त्वचेवर खाज आणि कोरडेपणा येऊ शकतो. केस गळू लागतात आणि खराब होतात. ही समस्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करते. वेळेपूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ही समस्या रोखली जाऊ शकते.

फॉलिक्युलिटिस लक्षणे

१. लाल पुरळ अथवा पिंपल्स. त्यामध्ये एक केस असतो.

२. जर पुरळ फुटली तर त्यामधून रक्त किंवा पस बाहेर येतो.

३. त्वचा संक्रमित होऊन, त्वचेवर जळजळ, सूज आणि खाज उद्भवते.

४. संसर्गित भागातील त्वचा अधिक कोमल होऊन वेदना होऊ लागतात.

वेळेवर उपचार करा.

फॉलिक्युलिटिस हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला नसेल तर काहीही उपचार न करता दोन आठवड्याच्या बरा होईल. त्यासाठी त्वचा गरम कापडाने शेकू शकता. मात्र, त्वचेवर लाल चट्टा, पुरळ, सूज वेदना अथवा पिंपल्स दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगळी असते, म्हणून जास्त उशीर न करता वेळीच उपचार सुरु करा.

समस्या निर्माण होण्याची कारणे?

ही समस्या उद्भवण्यामागे वेगवगेळी कारणे असू शकतात. जसे, डर्मेटायटिस आणि पिंपल्स, त्वचेवर विषाणू असल्याने किंवा केस तुटल्याने ही समस्या होऊ शकते. त्वचेवर काही जखम झाली असेल तरी देखील ही समस्या होऊ शकते. तसेच त्वचेवर कपड्यांचं घर्षण होणे किंवा शेव्हिंगमुळे होऊ शकते. ही समस्या निर्माण होण्यामागे काही विषाणू कारणीभूत असतात. हे विषाणू शरीरावर नेहमीच असतात आणि त्यांना स्टेफिलोकोकस असे म्हटलं जात.

उपचार

१. आपल्या रोजच्या लफस्टाइलमध्ये बदल करुन यापासून बचाव करु शकता. तसेच काही घरगुती उपाय सुद्धा तुम्ही करु शकता. जसे की, टॉवेल दुसऱ्यासोबत शेअर करु नका, शरीर स्वच्छ ठेवा, नखाने त्वचेवर खाजवू नका.

२. जास्त पाणी पिणे आरोग्यसाठी सगळ्याच दृष्टीने फायद्याचं असत. नियमित आणि योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते आणि फॉलिक्युलिटिसची समस्या रोखली जाऊ शकते.

३. जिथे पुरळ आली आहे तिथे सतत हात लावू नका किंवा पुरळ फोडण्याचा प्रयत्न करु नका. स्वच्छ कापडणारेच त्वचास्वच्छ करा.

४. फॉलिक्युलिटिसची समस्या उद्भवली असेल तर पुरुषांनी शेविंग तसेच महिलांनी वॅक्सिंग करु नये.