युतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीने चांगलेच यश मिळवले. त्यानंतर आता विधानसभेतही युती टिकून ठेवण्यास दोन्ही पक्ष तयारच आहेत. परंतू दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी वाद सुरू आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी दावा करत आहेत. त्यामुळे त्यांची युती बिनसण्याचीही शक्यता आहे. यावरून भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक बोलवून युती आवश्यक असल्याचे सांगितले आहे. सध्याची परिस्थिती पाहता युती कायम ठेवणे आवश्यक आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

मागील काही काळात भाजपाची ताकद वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. लोकसभेत भाजपामुळे शिवसेनेचे उमेदवारही निवडणून आले आहेत, त्यामुळे युतीची काय गरज अशा चर्चा सुरु आहेत. मात्र तसे नसून सध्या युती कायम ठेवणे आवश्यक आहे. मागील निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रावादी एकत्रित लढले असते तर आपल्याला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या. हे सांगताना त्यांनी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा कमी आल्या असल्यातरी त्यांचे मतदार खूप कमी झालेत असे नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने एकत्र लढले पाहिजे.

शिवसेना आणि भाजपची युती झाली तर दोन्ही पक्षांना मिळून १७० जागा मिळवता येतील, असा अंदाजही त्यांनी यावेळी लावला. पंरतू काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढले नाही तरी त्यांच्या जास्तीजास्त १० जागा प्रत्येकाच्या वाट्याला येतील, असं सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच विचारधारेचे आहेत. त्यामुळे त्यांच्या मतभेद असले तरी कोणाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. तसंच कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी तयारी करण्यास सांगितली आहे. अधिकाधिक जागा जिंकल्या तरी आपल्याला मित्रपक्षांची गरज पडणार आहे. त्यामुळे त्यासाठीही काम करावे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आरोग्यविषय वृत्त –