धनगर आरक्षणाच्या बाबतीत क्या हुआ तेरा वादा…. म्हणत धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईन

अनेकदा घोषणा करुन देखील धनगर आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकारला अद्याप देखील यश आलेलं नाही. यावरुनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री महोदय आता तरी सांगा क्या हुआ तेरा वादा असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार आहेत की नाही ही स्पष्टता आम्हाला ९७ च्या चर्चेत अपेक्षित आहे, अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी नियम ९७ च्या चर्चेदरम्यान मांडली.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e117a6ba-8a6a-11e8-95eb-597cc6f8e450′]

बुधवारी (18 जुलै) सकाळी धनगर समाजाच्या आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत ते बोलत होते. त्यावेळी  धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.

ज्या संस्थेकडे हा अहवाल तयार करण्यासाठी दिला आहे ती एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल. अशी शंका धनंयज मुंडे यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर सरकार या संस्थेच्या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक करत आहे असा आरोप देखील केला आहे.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0b94428-8a6a-11e8-8015-9de620975c30′]

आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात विधान केले. यांचे सर्वच नेते विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.