असे काय झाले होते की, IPL 10 मध्ये प्रीती झिंटाला कॅपमध्ये लपवावे लागले होते तोंड, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : ही गोष्ट आयपीएल-10 च्या त्या मॅचची आहे, त्या दिवशी शनिवार होता आणि दुसर्‍या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना दिल्ली डेयरडेव्हिल्सशी झाला होता. या मॅचमध्ये पंजाबच्या टीमला चीयर करण्यासाठी तिची को-ओनर आणि बॉलीवुड स्टार प्रीती झिंटा स्वत: सुद्धा उपस्थित होती. मॅचमध्ये एक क्षण असा सुद्धा आला जेव्हा तिने लाजेने चेहरा लपवला, सॅम बिलिंग्जने कॅच घेऊन अमलाला आऊट केले होते.

यावेळी मॅच पहात असलेल्या प्रीतीने अगोदर तर हा शॉट पाहून खूश दिसत होती. परंतु, पुढच्याच क्षणी तिचे एक्सप्रेशन बदलले.

जसा अमला कॅच आऊट झाला, अतिशय आनंदी दिसणार्‍या प्रीतीने आपला चेहरा अगोदर कॅपने आणि नंतर हाताने लपवला होता.

अमला 19 धावांवर रन आऊट झाला. मॅचमध्ये केवळ 31 रनच्या स्कोअरवर पंजाबची तिसरी विकेट पडल्यानंतर प्रीती खुप नाराज सुद्धा झाली होती.

असे होते क्षण
मॅचमध्ये दिल्लीच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग केली आणि 20 ओव्हरमध्ये 188/6 रन बनवल्या.
उत्तरादाखल टार्गेटचा पाठलाग करत पंजाबची टीम निर्धारित ओव्हर्समध्ये 137/9 धावाच बनवू शकली.
या मॅचमध्ये ऑलराऊंडर परफॉर्म करणारा दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कोरी एंडरसन ‘प्लेयर ऑफ द मॅच’ निवडला गेला.