‘निकामी’ होईल तुमचं PAN कार्ड ! जर 31 डिसेंबरपुर्वी नाही केलं ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही अजूनही आधार आणि पॅन लिंक केले नसेल तर तुमच्याकडे अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. आधार, पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड अवैध ठरु शकते. आयकर विभागाने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 केली आहे. जर असे केले नाही तर तुमचे पॅन अवैध ठरेल. पॅन अंतर्गत ही कायदेशीर तरतूद आहे, जे पाळणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर मानण्यात येईल की व्यक्तीने पॅन कार्डसाठी अर्जच केलेला नाही.

आयकर विभागाने आदेश दिल्यानंतर सर्व पॅन कार्ड धारकांना आपले पॅन आधारला वेळेत लिंक करणे आवश्यक झाले आहे. ऑनलाइन आणि एसएमएसच्या माध्यमातून लिंक करता येते. आधार, पॅन लिंक करण्याची ही सातवी संधी आहे.

असे लिंक करा आधार, पॅन –
1. तुम्ही तुमच्या पॅन आणि आधारला आयकर ई फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून लिंक करु शकतात. ई फायलिंग पोर्टलवर लिंक आधार असा पर्याय आहे. येथे तुम्हाला पॅन आणि आधार नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. याद्वारे तुम्हाला आधार पॅन लिंक करता येईल.

2. दुसरा पर्याय आहे, तुम्हाला 567678 किंवा 56161 वर SMS पाठवावा लागेल. तुम्हाला UIDPAN<12 डिजिट आधार नंबर>< 10 डिजिट पॅन नंबर टाकून दिलेल्या नंबरवर सेंड करावा लागेल.

लिंक करताना हे लक्षात ठेवा –
1. पॅन आणि आधार लिंक करताना तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, दोन्ही डॉक्यूमेंट्सवर तुमचे नाव, लिंग आणि जन्मतारीख सारखी असावी.
2. जर या कागदपत्रात काही फरक असेल तर आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल.
3. काही प्रकरणात पॅन आणि आधारवर नाव वेगवेगळे असेल, तर पॅन आणि आधार लिंक प्रक्रिया यामुळे फेल होईल. तुम्हाला या दोन्ही कागदपत्रातील एका कागदपत्रावरील माहिती बदलणे आवश्यक आहे.

 

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/