यकृत निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यकृत हे आपल्या शरीरात अतिशय महत्वाचे कार्य करते. जसे कि, साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.हे काम यकृत करत असते. आपल्या शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते. यकृतामध्ये ६ महिने पुरेल एवढा ‘अ’ जीवनसत्वचा साठा असतो आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.हे यकृतच करत असते.

तसेच निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिनची निर्मीती करणे. तसेच पित्त रस तयार करून त्याव्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. या बरोबरच आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.शरीरातील एवढ महत्वाचं कार्य यकृत करत असत. त्यामुळे आपण आपलं यकृत नोरोगी ठेवलं पाहिजे.

त्यामुळे यकृत निरोगी राहण्यासाठी जास्त फॅट, जास्त साखर, मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच तळलेले पदार्थ, फास्टफूड न खाल्लेलेच बरे.यकृताच कार्य चांगलं राहण्यासाठी डिहायड्रेशन होणं गरजेचं आहे. आणि डिहायड्रेशन होण्यासाठी खूप पाणी पिणे गरजेचे आहे. यकृत निरोगी राहण्यसाठी फळे, भाजीपाला खाणे योग्य ठरेल. तसेच मांस, कडधान्य, दूध या सर्व पदार्थांचा आपल्या आहारात उपयोग करा. यकृताला फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा जर आपल्या आहारात समावेश केला. यकृताला निरोगी ठेवणं सोपं जाईल.

फेसबुक पेज लाईक करा –