नाश्त्यात ‘हे’ 4 पदार्थ खा, वजन होईल कमी आणि राहाल निरोगी, 8 नियम जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन  – आहार आणि निरोगी जीवन याचा खुप जवळचा संबंध आहे. निरोगी राहण्याकरता चांगला आहार घेणे खुप गरजेचे आहे. त्यातही सकाळचा नाश्ता खुप महत्वाचा असतो. सकाळी योग्य प्रकारचा नाश्ता घेतल्यास तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहू शकते. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहाण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ घ्यावेत ते जाणून घेवूयात.

नाश्त्यात हे पदार्थ खा

1 कार्ब
नाशत्यात कार्ब आणि अनेक कडधान्यांचं सेवन करा. कॉम्प्लेक्स कार्बमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ब्लड शुगरचं प्रमाण योग्य राहाते.

2 दलिया किंवा ओट्स
नाश्त्यात दलिया किंवा ओट्सचा समावेश करू शकता. भरपूर कार्ब्स घेतल्याने सतत भूक लागत नाही आणि जास्त वेळ एनर्जी मिळते.

3 फळे
नाश्त्यातमध्ये हेल्दी पदार्थांसोबत काही फळांचाही समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडेंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स इत्यादी गोष्टी मिळतात. इम्यूनिटी मजबूत राहते. फळांमधील नैसर्गिक शुगर एनर्जी देते. धावपळ करण्यास एनर्जी मिळते. नाश्त्यात केळी, सफरचंद, पपई, द्राक्ष, डाळिंब इत्यादी फळांचा समावेश करावा.

4 दुध
दुधातून अनेक प्रकारचे डायट्री मिनरल्स मिळतात. त्यामुळे दुधाचा नाश्त्यात समावेश करा.

सकाळचा नाश्ता कसा असावा

1 नाश्ता दुपारच्या जेवणापेक्षा अधिक पोट भरणारा असला पाहिजे आणि डिनरच्या तुलनेत अधिक कॅलरी असलेला असावा.
2 नाश्त्यात फॅटचं प्रमाण कमी असावे. पण याचा अर्थ हा नाही की, फॅट अजिबातच असू नये.
3 दुपारच्या जेवणापर्यंत हेल्दी नाश्त्याने तुमचं पोट भरलेलं असलेलं पाहिजे. केवळ चहा आणि बिस्कीटांऐवजी आणखीही काही हेवी पदार्थ खाल्ले पाहिजेत.
4 भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त नाश्ता वजन कमी करण्यात अडचण निर्माण करू शकतो.
5 एक हलका नाश्ता लगेच पचेल आणि ब्लड शुगर लेव्हल कमी होईल.
6 मुळात हेल्दी नाश्ता तुम्हाला दिवसाची दमदार सुरूवात करण्यासाठी ऊर्जा देणारा असला पाहिजे.
7 हेवी आणि हेल्दी नाश्ता केल्यास दिवसभर एनर्जेटिक राहतात.
8 सकाळच्या नाश्त्यामध्ये कॅलरी फार कमी असण्याची गरज नसते.

हे टाळा

* नाश्त्यात ब्रेड, बिस्कीट आणि पावसह सर्वच प्रोसेस्ड किंवा रिफाइंड धान्य खाणं टाळा.