काय आहे डायबेटीक फूट अल्सर ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् उपचार पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम

डायबेटीक फूट अल्सर म्हणजे काय ?

डायबेटीक फूट अल्सर हा एक सामान्य परंतु तरीही खूप कॉम्प्लिकेशन असलेला अनियंत्रित डायबेटीस मेलिटस आहे. यात जखम बरी होणं हा प्रदीर्घ उपचार ठरतो. डायबेटीस मेलिटस ही अशी एक विकृती आहे जी निरोगी ग्रॅन्युलेशन (पुनरूत्पादन) टिश्यू तयार करण्यास विलंब करून उपचार प्रक्रिये दरम्यान अडथळा निर्माण करतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– संसर्ग झालेल्या नसांचं नुकसान झालं तर त्रास जाणवतो.
– हा अल्सर घट्ट त्वचेवर लाल रंगाच्या खड्ड्यासारखा दिसतो.
– गंभीर प्रकरणात हा लालसर खड्डा खोल जातो. तिथं स्नायूबंध आणि हाडांवर परिणाम होतो.
– प्रदाहात वाढ झाल्यानं सूज, उष्णता आणि वेदना होऊ शकतात.
– नंतरच्या अवस्थेत स्त्राव, दुर्गंधी आणि रंग बदललेले ग्रॅनुलेशन टिश्यु दिसतात.

काय आहेत याची कारणं ?

इंसुलिन वापरणाऱ्या रुग्णांमध्ये हा अल्सर जास्त प्रमाणात दिसून येतो.
– जास्त वजन, तंबाखू आणि अल्कोहोलचं सेवन हे डायबेटीक अल्सरचा त्रास अधिक वाढवू शकतात.
– कधी कधी त्या भागातील संवेदना गमावल्यानं आपल्याला अल्सर असल्याचं लक्षात येत नाही.
– खराब रक्ताभिसरणामुळं यावर उचार करण्यात अडथळा येतो आणि स्थिती अधिक चिघळते.
– याची सुरुवात एक लहान अल्सरच्या रूपात होते. संवेदना जास्त न जाणवल्यानं आपले याकडे दुर्लक्ष होते. यामुळं खोल डायबेटीक अल्सर तयार होतो.
– खोल डायबेटीक अल्सर तयार झाल्यानंतर दीर्घकाळ उपचार घेतले नाही तर यामुळं संसर्ग होऊन परिणामस्वरूप फोड येतो. या फोडामुळं ऑस्टियोमिलायटीस नावाचं हाडांचं संक्रमण होऊ शकतं.
– उपचाराला जर विलंब केला तर गँग्रीन होऊ शकतं. पाय कापण्याची गरज भासू शकते.

यावरील उपचार पद्धती पुढीलप्रमाणे –

– हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी
-जखमेवर नकारात्मक प्रेशर थेरपी
-दूषित क्षेत्राचे पुनरुत्थान
– ओझोन थेरपी
– प्रेशर काढून टाकणं
– संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अँटीबायोटीक्ससारखी औषधं

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.