Coronavirus : जागतिक आरोग्य ‘आणीबाणी’ म्हणजे काय ? जाणून घ्या ‘या’ 7 गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील यूबेई प्रांतातील वुहान शहरात मूळ असलेल्या ‘कोरोना’ विषाणू हळूहळू जगभर पसरत आहे. अनेक देशांत ‘कोरोना’ बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. चीनमध्ये 213 बळी पडले असून 10 हजार जणांना याची लागण झाली आहे. ‘करोना’ या जीवघेण्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आता जग सरसावलं आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणीबाणी घोषित केली आहे.

जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे नेमके काय ?
1. एखादा आजार जगभरात पसरण्याचा धोका असतो. ज्या आजारामुळे मोठ्या प्रमाणात जागतिक आरोग्य व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आणीबाणी घोषित केली जाते.

2. WHO कडून आणीबाणी जाहीर झाल्यानंतर सर्वच सदस्य देशांकडून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विशेष तयारी सुरु होते. अशा प्रकारच्या इमर्जन्सीसाठी ‘WHO’ कडून निधी बाजूला काढला जातो.

3. सर्वत्र वेगाने फैलावणाऱ्या आजाराचा सामना करण्यासाठी, हा आजार रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असते. त्यासाठी ‘WHO’ कडून आराखडा तयार केला जातो.

4. जागतिक आरोग्या संघटनेकडून आत्तापर्य़ंत करोना विषाणूचा प्रसार झालेल्या भागांमध्ये 18 लाख डॉलर्सचे वाटप केले आहे. ‘WHO’ कडे विविध देशांकडून जमा झालेला पैसा असतो. हा पैसा आपतकालीन स्थितीत आजाराचा फैलाव रोखण्यासाठी वाटला जातो. या संघटनेचे 196 सदस्य देश असून, कायदेशीर दृष्ट्या त्यांना काही गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे.

5. जागतिक आरोग्य आणीबाणीमध्ये प्रवासासंदर्भात काही शिफारशींचा समावेश होतो. यामध्ये देशांच्या सीमांवर, आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाते. या संघटनेकडून कधीही ज्या देशात आजाराचे मूळ आहे, तिथे प्रवास बंदीचा सल्ला दिला जात नाही.

6. पूर्व आफिकेमधून निर्मिती झालेल्या इबोलाच्यावेळी देखील जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली होती. या ईबोलामुळे आतापर्यंत तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.