Budget 2019 : ‘गोल्ड सेव्हिंग अकाऊंट’ची घोषणा ? ; पैसे जमा केल्यानंतर खात्यावर होणार सोनं जमा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ५ जुलै ला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार अनेक नवीन निर्णय घेईल असे अंदाज वर्तविले जात आहेत. यातीलच एक म्हणजे सरकार आता गोल्ड सेविंग अकाउंट च्या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. हे खाते देखील सर्वसाधारण खात्याप्रमाणे बँकांच्या शाखेत उघडता येईल तसेच कोणीही व्यक्ती हे खाते उघडू शकतो. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये नीती आयोगाने वित्त मंत्रालयाला गोल्ड सेविंग अकाउंट ची सुविधा सुरु करण्याची शिफारस केली होती.
पैसे जमा केल्यावर बँकेच्या खात्यावरील सोने वाढणार :
गोल्ड सेविंग अकाउंट ची एक प्रमुख विशेषता म्हणजे तुम्ही खात्यावर पैसे जमा केल्यानंतर तुमच्या खात्यावर मात्र पैशांऐवजी तेवढ्या किमतीचे सोने वाढणार आहे. समजा तुम्ही बँकेत १५,००० रुपये जमा केले आणि तत्कालीन सोन्याची किंमत ३०,००० रुपये प्रतितोळा (प्रति १० ग्रॅम) एवढी असेल तर तुमच्या खात्यावर अर्धा तोळा सोने जमा होईल. कमीत कमी सोन्याच्या एक ग्रॅम किमतीएवढे पैसे एका वेळी जमा करावे लागतील.
रक्कम किंवा सोने जे हवे ते काढू शकाल :
नीती आयोगाच्या शिफारशीनुसार ग्राहकाला त्याच्या आवश्यकतेनुसार सोने किंवा रोख पैसे यांपैकी हवे ते काढण्याची सुविधा पुरवली जाईल. समजा तुमच्या खात्यावर १ किलो सोने आहे आहे ज्याची बाजारभावानुसार किंमत ३०लाख रुपये आहे तर तुम्ही सोने किंवा ३० लाख रुपये यांपैकी हवे ते काढू शकता.
या खात्यावर व्याज देखील मिळणार :
सर्वसाधारण खात्याप्रमाणे गोल्ड सेविंग अकाउंट वर व्याज देखील मिळणार आहे. या व्याजाचा दर नंतर निश्चित होणार असून ते थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच गोल्ड बॉण्ड प्रमाणे तुम्हाला पैसे परत मिळवण्यासाठी ठराविक वेळेची वाट पाहावी लागणार नसून तुम्हाला हवे तेव्हा तात्काळ तुम्ही तुमच्या शाखेतून पैसे अथवा सोने काढू शकता.
कसल्याही प्रकारचा भांडवल कर नाही :
तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर किंवा सोन्यावर कोणत्याही प्रकारचा भांडवल कर लागणार नाही. रक्कम जमा करताना बाजारभावाप्रमाणे जमा होणाऱ्या सोन्यावर जीएसटी आणि आयातकर मात्र आकारले जाईल. तसेच रक्कम काढताना ज्या दिवशी रक्कम काढाल त्या दिवशीच्या बाजारभावाप्रमाणे सोने किंवा पैसे मिळतील.
‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स
केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’
निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय
लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?
धक्कादायक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला बसमधून उतरविण्याचा प्रयत्न