काय असतो Air Quality Index ? जो तुम्हाला सांगतो हवा चांगली आहे की खराब

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनादरम्यान पुन्हा एकदा एयर पोल्यूशनचा धोका निर्माण झाला आहे. हवेची क्वालिटी खराब झाल्यानंतर वाढत्या प्रदुषणामुळे 15 ऑक्टोबरपासून ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅन (जीआरएपी) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या दिल्ली पोल्यूशन कंट्रोल कमेटी (डीपीसीसी) ने डिझेल, पेट्रोल, केरोसिनवर चालणार्‍या जनरेटर सेटवर प्रतिबंध लावण्याचे निर्देश जारी केले आहेत.

एयर क्वालिटी इंडेक्स वायुमध्ये नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइडची मात्रा पाहिली जाते. ज्यामध्ये ठरवले जाते की, यांची मात्रा जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ठरवलेल्या मापदंडापेक्षा जास्त आहे किंवा नाही.

हा इंडेक्स हवेची माहिती देतो. ही हवा गुणवत्तेबाबत माहीती देते. यामध्ये सांगितले जाते की, हवेत कोणता गॅस किती मिळसलेला आहे. या इंडेक्समध्ये 6 कॅटेगरी बनवण्यात आली आहे.

या आहेत 6 कॅटेगरी

1. चांगली
2. समधानकारक
3. थोडी प्रदूषित
4. खराब
5. खुप खराब
6. गंभीर

एयर क्वालिटी इंडेक्स प्रामुख्याने 8 प्रदूषकांनी (पीएम 10, पीएम 2.5, एनओ 2, एसओ 2, सीओ, ओ 3, एनएच 3, अँड पीबी) मिळून बनवला जातो. यामध्ये वायु प्रदूषणाचा अर्थ म्हणजे हवेत सल्फर डाइऑक्साइड (एसओ 2), नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ2), आणि कार्बन मोनोऑक्साइड (सीओ) ची मात्रा जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानदंडापेक्षा जास्त असणे.

दिल्लीत वायु प्रदुषणाची समस्या भयंकर बणवण्यात मुख्य भूमिका हवेतील पीएम 2.5 आणि पीएम 10 कणांची असते. ज्या कारणामुळे कणांचा सतर वायुत वाढतो, तेव्हा श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ होते. तर हवेतील कणांचा अर्थ आहे की, दिल्लीकर रोज 21 सिगारेटच्या बरोबर धुर गिळत आहेत.

हवा वाहणे कमी होणे, दिवाळीत फटाके फोडणे, हरियाणा आणि पंजाबच्या शेतकर्‍यांनी पराली जाळणे, वाहनांच्या संख्येत अतिवाढ होणे, वृक्षतोड, ग्लोब वॉर्मिंग वाढणे, ही याची कारणे आहे.

जीआरएपी एक अ‍ॅक्शन प्लॅन आहे, जो ईपीसीएद्वारे बनवला गेला आहे, जो थंडीत दिल्लीत प्रदुषण रोखण्यासाठी लागू केला जातो. यामध्ये अथॉरिटी प्रत्येक धोरणात्मक पावले उचलू शकते.